---Advertisement---

टी20 वर्ल्डकप जिंकून न्यूझीलंड मालामाल, आयसीसीनं भारतावरही केला करोडोंचा वर्षाव

On: सोमवार, ऑक्टोबर 21, 2024 7:43 AM
---Advertisement---

महिला टी20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडनं दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून विजेतेपदावर कब्जा केला. 2009 आणि 2010 च्या अंतिम फेरीत पराभवाचा सामना केल्यानंतर किवी संघानं अखेर फायनलमध्ये विजय मिळवला.

न्यूझीलंडचं हे पहिलंच टी20 विश्वचषक विजेतेपद आहे. तर महिला टी20 विश्वचषक जिंकणारा हा एकूण चौथा संघ ठरला. न्यूझीलंडच्या या विजयानंतर आयसीसीनं संघावर पैशांचा वर्षाव केला आहे. किवी संघानं ही स्पर्धा जिंकून 21 कोटींहून अधिकची कमाई केली. तर उपविजेती दक्षिण आफ्रिकाही मालामाल झाली आहे.

यावेळी आयसीसीनं महिला क्रिकेटच्या बक्षीस रकमेत वाढ करून ती पुरुष क्रिकेटच्या बरोबरीची केली होती. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व 10 संघांसाठी बक्षीस रक्कम निश्चित करण्यात आली होती. आयसीसीनं 2024 महिला टी20 विश्वचषक स्पर्धेसाठी एकूण 79.58 लाख डॉलर्सची बक्षीस रक्कम जाहीर केली होती, जी भारतीय रुपयात अंदाजे 66.89 कोटी रुपये आहे.

या स्पर्धेत सहभागी होणारा कोणताही संघ रिकाम्या हातानं मायदेशी परतणार नाही, असा निर्णय आयसीसीनं आधीच घेतला होता. आयसीसीनं स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक संघांसाठी 1,12,500 डॉलर्सची बक्षीस रक्कम ठेवली होती, जी अंदाजे 94.56 लाख रुपये आहे. याशिवाय, ग्रुप स्टेजमधील प्रत्येक सामना जिंकण्यासाठी प्रत्येक संघाला 31,154 डॉलर म्हणजेच 26.18 लाख रुपये मिळाले. गटात तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या संघांना 2.70 लाख डॉलर्स, तर पाचव्या क्रमांकावर असलेल्या संघांना 1.35 लाख डॉलर्सचे बक्षीस देण्यात आले.

न्यूझीलंडनं या स्पर्धेत एकूण 21.14 कोटी रुपयांची कमाई केली. संघाला विजेतेपदासाठी 19.42 कोटी रुपये मिळाले, तर गट टप्प्यातील तीन सामने जिंकल्यामुळे 78.54 लाख रुपये आणि स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 94.56 लाख रुपये मिळाले. उपविजेत्या दक्षिण आफ्रिकेनं 11.56 कोटी रुपयांची कमाई केली. भारताला उपांत्य फेरीपर्यंत मजल मारता आली नाही. परंतु संघाच्या खात्यात 3.74 कोटी रुपये जमा झाले.

हेही वाचा – 

Women’s T20 World Cup; फायनलमध्ये आफ्रिकेला चितपट करून न्यूझीलंडने जिंकला विश्वचषक!
IND vs NZ; राहुल खेळला शेवटचा कसोटी सामना? व्हायरल व्हिडिओमुळे सोशल मीडियावर उडाली खळबळ
SA vs BAN; पहिल्या कसोटीत खेळणार का शाकिब अल हसन? कर्णधार म्हणाला…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---