झिम्बाब्वे आणि भारत यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेची सोमवारी (२२ ऑगस्ट) पार पडली. हरारे येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात भारतीय संघाने यजमान झिम्बाब्वेला १३ धावांनी पराभूत करून मालिका ३-० अशा फरकाने आपल्या नावे करत, यजमान संघाला व्हाईट वॉश दिला. तिसऱ्या सामन्यात २९० धावांचा पाठलाग करताना झिम्बाब्वेच्या सिकंदर रझाने अखेरपर्यंत शर्तीचे प्रयत्न केले. त्याच्या शानदार शतकानंतरही झिम्बाब्वेला सामना जिंकण्यात अपयश आले. मात्र, या शतकानंतर त्याने भारताचा सर्वकालीन महान फलंदाज सचिन तेंडुलकर याची बरोबरी केली.
भारतीय संघाने दिलेल्या २९० धावांच्या आव्हानासमोर झिम्बाब्वे संघाला चांगली सुरुवात मिळाली नव्हती. मात्र, पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या सिकंदर रझाने डावाची सूत्रे हाती घेतली. त्याने शानदार फलंदाजी करत झिम्बाब्वेला सामन्यात कायम ठेवले. आठव्या गड्यासाठी ब्रॅड इवान्ससह त्याने शतकी भागीदारी केली. रझाने ९५ चेंडूवर ९ चौकार व तीन षटकारांच्या मदतीने ११५ धावा काढल्या. मात्र, तो संघाला अंतिम रेषेपार नेऊ शकला नाही.
त्याने या शतकी खेळी दरम्यान भारताचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर याच्या २२ वर्ष जुन्या विक्रमाची बरोबरी केली. एकाच महिन्यात वनडे क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करताना तीन शतके ठोकण्याची कामगिरी सचिनने १९९८ मध्ये केलेली. सचिनने शारजा येथे कोकाकोला कपमध्ये ही कामगिरी केलेली. तर रझाने याच महिन्यात बांगलादेश विरुद्ध दोन शतके ठोकत संघाला मालिका जिंकून दिली होती. रझा बांगलादेश विरुद्धच्या मालिकेत मालिकावीर ठरला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! टी२० विश्वचषकाबाबत मोठी बातमी समोर, ‘या’ देशात केलं जाणार आयोजन
रोहितच्या म्हणण्याने नाही, तर ‘या’ तारखेच्या बैठकीत ठरणार टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघ
उधारीची जर्सी घालणाऱ्या धवनकडे चाहत्याने मागितला शर्ट, गब्बरची रिएक्शन पाहून तुम्हीही म्हणाल…