---Advertisement---

मूळचा पाकिस्तानी असलेला ‘हा’ खेळाडू खेळणार आयपीएल, लिलावात ठेवली 50 लाख बेस प्राईझ

On: शुक्रवार, डिसेंबर 9, 2022 5:21 PM
Shoaib Malik Retirement
---Advertisement---

सध्या आयपीएलच्या तयारीला जोरदार सुरुवात झाली आहे. आयपीएल स्पर्धेचा यंदा सोळावा हंगाम असणार आहे. या स्पर्धेत असे अनेक खेळाडू आहेत, जे या स्पर्धेत पहिल्यांदा खेळणार आहेत. चाहते देखील अशा खेळाडूंना आयपीएलमध्य बघायला उत्सुक असणार आहे. झिम्बाब्वे संघाचा स्टार गोलंदाज सिकंदर रझा याच्यावर आता सर्व संघाचे लक्ष असणार आहे. सिकंदर रझा याने टी20 विश्वचशषकात आपल्या संघासाठी दिमाखदार कामगिरी केली होती.

झिम्बाब्वे देशाचा सिकंदर रझा (Sikandar Raza) पहिल्यांदाच आयपीएलच्या लिलावामध्ये झळकणार आहे. सिकंदरने टी20 विश्वचषकात दैदिप्यमान कामगिरी केली. या विश्वचषकात खेळलेल्या 8 सामन्यात त्याने 10 विकेट्स मिळवल्या. त्याच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर झिम्बाब्वे संघ पाकिस्तानला हरवू शकला. त्याच्या याच प्रदर्शनामुळे त्याला आयपीएलमध्ये मोठी रक्कम मिळू शकते. आयपीएलच्या लिलावासाठी त्याने आपली बेस प्राईझ 50 लाख इतकी ठेवली आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांसारखे बडे संघ देखील त्याला आपल्या ताफ्यात सामील करुन घेण्यासाठी उत्सुक असतील.

कोण आहे सिकंदर रझा ?
सिकंदर मुळचा पाकिस्तान देशातला. सिकंदरचा जन्म पाकिस्तानातील पंजाब प्रांतामधील सियालकोटमध्ये झाला. सिकंदर 2002मध्ये आपल्या कुटुंबासहित झिम्बाब्वेमध्ये आला. त्याने झिम्बाब्वेच्या क्रिकेट संघामध्ये आपले स्थान मिळवले. सिकंदरला आधी पाकिस्तानी वायुसेनेत फायटर पायलट व्हायचे होते. त्याने 3 वर्ष सेनेच्या शाळेत शिक्षण घेतले. मात्र, त्याला त्याच्या दृष्टीमुळे घेण्यात आले नव्हते. सिकंदरचे आयुष्य अडचणींने भरलेले होते. जेव्हा 2002मध्ये तो झिम्बाब्वेचे नागरिकत्व देखील मिळाले नव्हते. 9 वर्षांनंतर 2011मध्ये त्याला नागरिकत्व देण्यात आले.

रझाची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
झिम्बाब्वे संघासाठी रझाने आतापर्यंत 17 कसोटी, 123 एकदिवसीय आणि 63 टी20 सामने खेळले आहेत. त्याने कसोटीमध्ये 1 तर एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वे संघासाठी 6 शतके झळकावली आहेत.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रोहितच्या फिटनेसवर पहिल्यांदाच बोलले जय शाह, कसोटी मालिकेबद्दल दिली मोठी प्रतिक्रिया
“आपण वनडे क्रिकेटमध्ये 10 वर्ष मागे”; दिग्गजाचे टीम इंडियावर टीकास्त्र

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---