आशिया चषक २०२२ पूर्वी भारतीय क्रिकेट संघाला झिम्बाब्वे संघाचा सामना करायचा आहे. उभय संघात १८ ऑगस्टपासून ३ सामन्यांची वनडे मालिका होणार आहे. ही मालिका २२ ऑगस्ट रोजी संपेल. यजमान झिम्बाब्वेचा संघ सध्या चांगल्या लयीत आहे. नुकताच त्यांनी बांगलादेशला वनडे आणि टी२०, या दोन्ही मालिकांमध्ये पराभवाचा धक्का दिला आहे. त्यातही झिम्बाब्वे संघाचे २ खेळाडू जबरदस्त लयीत आहेत. त्यामुळे पाहुण्या भारतीय संघाला त्यांना कमी समजणे महागात पडू शकते.
भारताविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी (India vs Zimbabwe) झिम्बाब्वेने १७ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. नियमित कर्णधार क्रेग इर्विन याला दुखापतीमुळे या मालिकेत खेळता येणार नसल्याने त्याच्याजागी रेगिस चकाब्वा (Regis Chakabva) याची प्रभारी कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. इर्विनव्यतिरिक्त डावखुरा फिरकीपटू वेलिंग्टन मसाकाद्जा, वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुजरबानी आणि तेंदाई चतारा यांनाही दुखापती झाल्या आहेत. हे चारही प्रमुख खेळाडू भारताविरुद्ध उपलब्ध राहू शकणार नाहीत.
तरीही झिम्बाब्वेचा संघ बलाढ्य भारताविरुद्ध पलटवार करण्याची ताकद राखतो. झिम्बाब्वेचे २ खेळाडू भारतीय संघापुढील समस्या वाढवू शकतात. ते खेळाडू म्हणजे, अष्टपैलू सिकंदर रजा (Sikandar Raza) आणि कर्णधार रेगिस चकाब्वा होय.
रजाने नुकतीच ठोकलीत २ शतके
रजा सध्या जबरदस्त लयीत असून त्याने नुकत्याच मायदेशात झालेल्या वनडे मालिकेत खोऱ्याने धावा काढल्या आहेत. तसेच चेंडूसोबतही त्याचे प्रदर्शन प्रशंसनीय राहिले आहे. त्याने ३ वनडे सामन्यांमध्ये कौतुकास्पद २५२ च्या सरासरीने २५२ धावा काढल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून २ शतके निघाली आहेत. विशेष म्हणजे, त्याने सलग २ सामन्यांमध्ये ही शतके ठोकली आहेत. फलंदाजीबरोबरच गोलंदाजीतही त्याने कमाल केली आहे. त्याने ३ वनडे सामन्यात बांगलादेशच्या ५ फलंदाजांला बाद केले आहे.
कर्णधाराची जबाबदारी चांगलीच निभावतोय चकाब्वा
प्रभारी कर्णधार चकाब्वा हा देखील सध्या चांगल्या लयीत आहे. त्याने नुकतेच बांगलादेशविरुद्धच्या वनडे सामन्यात शतक करत भारतीय गोलंदाजांना चेतावणी दिली आहे. त्याने बांगलादेशविरुद्ध २ सामने खेळताना ५२ च्या सरासरीने १०४ धावा केल्या आहेत.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
सलग ६ चेंडूत ६ षटकार मारणारा ‘हा’ भारतीय खेळाडू झिम्बाब्वेविरुद्ध करणार आंतरराष्ट्रीय पदार्पण?
अल्टिमेट खो-खो स्पर्धेत गुजरात जायंट्स संघाची विजयाची हॅट्रिक, मुंबई खिलाडीजवर सलग दुसऱ्यांदा मात