गुरुवारी (११ ऑगस्ट) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) येत्या झिम्बाब्वे दौऱ्यासाठीच्या भारतीय संघात महत्त्वपूर्ण बदल केला आहे. या दौऱ्यात भारतीय संघाला झिम्बाब्वेविरुद्ध १८ ऑगस्टपासून ३ सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवडण्यात आलेल्या शिखर धवन याच्याजागी पुनरागमन करत असलेल्या केएल राहुल याची नियुक्त करण्यात आली आहे. परंतु राहुलवर नेतृत्त्वाची जबाबदारी सोपवणे बीसीसीआयसाठी घातक सिद्ध होऊ शकते. इतकेच नव्हे तर, भारतीय संघ ही मालिकाही गमावू शकतो, असे आम्ही नाही तर आकडे सांगतात.
कर्णधार म्हणून राहुलने नेहमीच केलीय निराशा
राहुलची (KL Rahul) भारताच्या वनडे संघाचे नेतृत्त्व करतानाचे आकडे निराशादायी राहिले आहेत. त्याने जानेवारीत पहिल्यांदा भारतीय संघाचे नेतृत्त्व केले होते. नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या अनुपस्थितीत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी राहुलला कर्णधार बनवले गेले होते. परंतु या मालिकेत भारतीय संघाचे फार हाल झाले होते. दक्षिण आफ्रिकेने या मालिकेत भारताला ३-० ने पराभूत केले होते अर्थातच व्हाईटवॉश दिला होता.
इतकेच नव्हे तर, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यातही त्याला कर्णधार बनवले गेले होते. मात्र हा सामनाही भारतीय संघाने गमावला होता.
शिखर धवनचे कर्णधार म्हणून आकडे
दुसरीकडे भारतीय संघाचा अनुभवी सलामीवीर शिखर धवन (Shikha Dhawan) याचे वनडेतील नेतृत्त्वाचे आकडे प्रशंसनीय राहिले आहेत. मागील वर्षी श्रीलंकेत झालेल्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत धवनने भारतीय संघाचे नेतृत्त्व केले होते. या मालिकेत भारताने २-१ असा विजय मिळवला होता. तसेच वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतही धवनच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने विजयी कामगिरी केली होती. या मालिकेत भारताने वेस्ट इंडिजला ३-० अशा फरकाने पराभूत केले होते.
हे आकडे पाहता, झिम्बाब्वे दौऱ्यावर भारतीय संघाचे नेतृत्त्व करण्यासाठी राहुलपेक्षा धवन हा योग्य पर्याय होता, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
आशिया चषकापूर्वी सूर्यकुमार यादवने घेतली लक्झरी कार, किंमत ऐकुण तुम्हीही व्हाल हैरान
चांगला फॉर्म, सर्वाधिक धावा; तरीही आशिया चषकासाठी दुर्लक्षित राहिले ‘हे’ दोघे भारतीय