आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) 2022 च्या सुरुवातीपासून प्रत्येक महिन्याच्या सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी ‘आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ’ हा पुरस्कार देण्याची सुरुवात केली होती. ऑगस्ट महिन्याच्या या पुरस्कारांची आता घोषणा झाली असून, पुरुष गटात झिम्बाब्वेचा अनुभवी अष्टपैलू सिकंदर रझा व महिला गटात ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू ताहिला मॅकग्राने बाजी मारली. आयसीसीने ट्विट करून ही माहिती दिली आहे.
ऑगस्ट महिन्याच्या ‘प्लेयर ऑफ द मंथ’ पुरस्कारासाठी पुरुष गटात सिकंदर रझा व्यतिरिक्त न्यूझीलंडचा अष्टपैलू मिचेल सॅंटनर व इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स यांना नामांकन मिळाले होते. तर, महिला गटात मॅकग्रासह ऑस्ट्रेलियाचीच अनुभवी फलंदाज बेथ मुनी व भारताची मधल्या फळीतील फलंदाज जेमिमा रॉड्रिग्ज यांना नामांकन देण्यात आलेले.
A Commonwealth Games gold medallist wins the ICC Women’s Player of the Month for August 2022 ????
Details ????
— ICC (@ICC) September 12, 2022
सिकंदर रझाने हा पुरस्कार मिळाल्यानंतर आपली प्रतिक्रिया देताना म्हटले,
Unveiling the ICC Men's Player of the Month for August 2022 ????
He is the first from his country to win the award ⬇️
— ICC (@ICC) September 12, 2022
“मागील चार महिन्यांपासून मला साथ दिलेला संघातील सर्व खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि चाहत्यांना मी हा पुरस्कार अर्पण करतो. चाहत्यांनी दिलेल्या या प्रेमासाठी मी त्यांचे आभार मानतो.”
सिकंदर रझा याच्यासाठी मागील महिना कमालीचा गेला. बांगलादेश दौऱ्यावर त्याने सलग दोन शतके ठोकत झिम्बाब्वेला मालिका जिंकून देण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. त्यानंतर भारतीय संघाविरुद्ध झालेल्या मायदेशातील वनडे मालिकेतही त्याने आपला हा फॉर्म कायम राखला. भारताविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात 95 चेंडूवर 115 धावा करत धावांचा पाठलाग करण्यासाठी शर्थीच प्रयत्न केले होते. दुसरीकडे मॅकग्राने प्रथमच झालेल्या राष्ट्रकुल महिला क्रिकेट स्पर्धेत चमकदार कामगिरी केलेली. फलंदाजी आणि गोलंदाजीत योगदान देत ऑस्ट्रेलियाला सुवर्णपदक जिंकून देण्यात तिचा सिंहाचा वाटा होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा –
महत्वाच्या बातम्या –
वयाच्या 19 व्या वर्षी अल्कारझचे घवघवीत यश, यूएस ओपन जिंकत एटीपी क्रमवारीत पोहोचला अव्वलस्थानी
सर्वात भीषण आतंकवादी हल्ल्यात मरण पावलेला एकमेव क्रिकेटपटू, लाराविरूद्ध केलेले नेतृत्व






