न्यूझीलंड क्रिकेट संघ इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात नियमित कर्णधार केन विलियम्सन याच्या अनुपस्थितीत खेळत आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंड संघातील हा दुसरा सामना नॉटिंघम येथील ट्रेंट ब्रिज मैदानावर खेळला जात आहे. कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने विलियम्सन याला या सामन्यात खेळता येत नाहीये. विलियम्सनच्या जागी टॉम लॅथम याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
लॉर्ड्स कसोटीमध्ये न्यूझीलंड संघाला पराभवाचे तोंड पहावे लागले होते, ज्यामुळे न्यूझीलंडचा संघ मालिकेमध्ये ०-१ ने मागे आहे. अशात न्यूझीलंडचे माजी खेळाडू सायमन डूल (Simon Doull) यांच्या मते, न्यूझीलंड संघाचा कसोटी कर्णधार बदलण्याची ही योग्य वेळ आहे.
केन विलियम्सन (Kane Williamson) २०१६ पासून संघाचे नेतृत्व करत आहे. ब्रेंडन मॅक्युलमने जागतिक क्रिकेटला निरोप दिल्यानंतर केन विलियम्सनने कर्णधारपद सांभाळले. डूल यांना वाटते की, विलियम्सन आतापर्यंतचा सर्वश्रेष्ठ फलंदाज बनला पाहिजे.
ते म्हणाले की, “मला वाटते की, जर विलियम्सन तिसऱ्या कसोटीमध्ये खेळण्यासाठी आणि कर्णधारपद सांभाळण्यासाठी सज्ज असेल, तर ते कसोटी क्रिकेटमध्ये शेवटचे असू शकते. टॉम लॅथमची कसोटीमध्ये कर्णधार म्हणून खेळण्याची वेळ आली आहे. केनने हे काम खूप वर्ष केले आहे आणि मला वाटते की, त्याने आता न्यूझीलंडचा सर्वोत्तम फलंदाज म्हणून खेळावा आणि ते होईलही.”
“दुदैव हेच की, त्याला हे कर्णधारपद कमी वयात दिले गेले होते. काही लोक त्याचा आनंद घेतात, तर काही नाही. मला वाटते की, हे विलियम्सनवर अवलंबून करते की, तो त्याचा आनंद घेतो की नाही, पण त्यामुळे त्याच्या फलंदाजीवर खूप परिणाम होऊ शकतो,” असेही पुढे बोलताना डूल म्हणाले.
विलियम्सनची कसोटी कारकीर्द
विलियम्सन याने न्यूझीलंडकडून आतापर्यंत ८७ कसोटी सामने खेळले आहेत. त्यात त्याने १५२ डावात ५२.८१च्या सरासरीने ७२८९ धााव चोपल्या आहेत. या धावा करताना त्याने २४ शतके आणि ३३ अर्धशतके झळकावली आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘किलर’ मिलरचा काटा काढण्यासाठी द्रविड गुरू आखू शकतात ‘या’ ४ रणनीती, वाचा सविस्तर
दिनेश कार्तिक नव्हे तर ‘हा’ खेळाडू ठरेल भारतीय संघासाठी सर्वात मोठा गेमचेंजर, माजी कर्णधाराचा दावा