---Advertisement---

“आयपीएलमध्ये न्यूझीलंडच्या खेळाडूंना डावलले जाते”, माजी क्रिकेटपटूने केला मोठा आरोप

On: सोमवार, फेब्रुवारी 22, 2021 10:53 PM
---Advertisement---

आयपीएलच्या चौदाव्या हंगामासाठीचा खेळाडूंचा लिलाव १८ फेब्रुवारी रोजी चेन्नई येथे पार पडला. या लिलावात अनेक खेळाडूंना कोट्यवधी रुपयांच्या बोली लावल्या गेल्या. काही कमी अनुभवी खेळाडूंना देखील कोटींच्या घरात रक्कम दिली गेली. त्याचवेळी, काही खेळाडूंना या लिलावात कोणीही खरेदी केले नाही. तोच धागा पकडत न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू सायमन डूल याने न्यूझीलंडचा खेळाडूंकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप केला आहे.

हे आहे प्रकरण

सोमवारपासून (२२ फेब्रुवारी) ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील टी२० मालिकेला सुरुवात झाली. या सामन्यात न्यूझीलंडचा फलंदाज डेवॉन कॉनवे तडाखेबंद फलंदाजी करत ५९ चेंडूंमध्ये १६७ च्या स्ट्राईक रेटने १० चौकार व ३ षटकारांच्या मदतीने ९९ धावांची नाबाद खेळी केली. कॉनवेने खेळलेल्या मागील तीनही आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात ९० पेक्षा अधिक धावा बनविल्या आहेत.

अश्विनने केले अभिनंदन

कॉनवेच्या या लाजवाब खेळीनंतर भारतीय संघाचा अनुभवी खेळाडू रविचंद्रन आश्विनने ट्विट करताना लिहिले, ‘डेवॉन कॉनवे चार दिवस उशीर झाला मात्र शानदार खेळी केलीस.’

चार दिवसांपूर्वीच आयपीएलचा लिलाव झाला होता ज्यामध्ये खेळाडूंना मोठ्या बोल्या लागल्या होत्या. अश्विनने अप्रत्यक्षरीत्या म्हटले की, त्याने आधी अशी खेळी केली असती तर त्याला देखील लिलावात कोणीतरी विकत घेतले असते.

https://twitter.com/ashwinravi99/status/1363755742247804930

सायमन डूलने दिली प्रतिक्रिया

अश्विनने कॉनवेचे कौतुक केल्याचा धागा पकडत न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू व सध्या समालोचक म्हणून काम करणारा सायमन डूल याने अश्विनच्या ट्विटला उत्तर देताना म्हटले, ‘हे तितक महत्वाचं नाही. आयपीएलमध्ये कायमच न्यूझीलंडच्या प्रतिभावंत खेळाडूंना डावलून ऑस्ट्रेलियाच्या दुय्यम दर्जाचा खेळाडूंना कोट्यावधी रुपये मिळत असतात.’

https://twitter.com/Sdoull/status/1363822265062748160

चेन्नई येथे झालेल्या लिलावात ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलने १४.२५ कोटी, झाय रिचर्डसनने१४ कोटी तर एकही आंतरराष्ट्रीय सामना न खेळलेल्या रायली मरडीथला ८ कोटी रुपयांची घसघशीत कमाई केली होती. तर, ५० लाख रुपये आधारभूत किंमत असलेल्या कॉनवेला कोणीही खरेदीदार लाभला नव्हता.

महत्त्वाच्या बातम्या –

चमिंडा वासने तीन दिवसातच प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिल्याने उडाली खळबळ; ‘हे’ आहे कारण

ब्रॉड की अँडरसन ? कोण खेळणार तिसऱ्या कसोटीत, स्वतः ब्रॉडने दिले उत्तर

INDvENG: दिवस-रात्र कसोटीसाठी असा असू शकतो ११ जणांचा भारतीय संघ; ‘या’ खेळाडूंना मिळू शकते संधी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---