नोव्हेंबर महिन्यापासून सुरू होत असलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी नुकतीच भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. मात्र, भारताच्या या अंतिम पथकात मुंबई इंडियन्सच्या सूर्यकुमार यादवला स्थान न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
अशात बुधवारी (२८ ऑक्टोबर) झालेल्या मुंबई आणि बेंगलोर सामन्यात सूर्यकुमारने धुवांधार फलंदाजी करत मुंबईला एकहाती विजय मिळवून दिला. त्यानंतर आता पुन्हा एकदा सूर्यकुमारची संघात निवड न होण्याबद्दल चर्चा रंगू लागली आहे. अशात न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू सायमन डोल यांनी सूर्यकुमारला मोलाचा सल्ला दिला आहे.
नक्की एका दिवशी भारतीय संघाची दारे उघडतील
क्रिकबझशी बोलताना सायमन डोल म्हणाले की, “तुला भारतीय संघात स्थान मिळवायचे असेल, तर तू सतत भारतीय संघ निवडकर्त्यांना तुझा विचार करायला भाग पाडले पाहिजे. त्यांचा निर्णय काहीही असो, पण तू हार मानू नको. वाट पाहा. नक्कीच एके दिवशी तुझ्यासाठी भारतीय संघाची दारे खुली होतील.”
“सूर्यकुमारने गेल्या काही वर्षांत देशांतर्गत क्रिकेटमध्ये कमालीचे प्रदर्शन केले आहे. तसेच गेल्या ३ वर्षांपासून तो आयपीएलमध्ये नेत्रदिपक फलंदाजी करत आहे. अशाप्रकारे त्याने सर्वांना प्रभावित करणे चालू ठेवावे,” असे पुढे त्यांनी सांगितले.
शेवटी सायमन डोल यांनी सूर्यकुमारच्या फलंदाजीची तोंडभरुन प्रशंसा केली. ते म्हणाले की, “त्याची स्पिन गोलंदाजांविरुद्ध खेळण्याची पद्धत कमालीची आहे. तसेच त्याची शॉर्ट किंवा फुल बॉलवर जोरदार शॉट्स मारण्याची पद्धतही मला खूप आवडते. एवढेच नाही तर, लक्ष्याचा पाठलाग करताना तो फक्त त्याचे उत्कृष्ट देण्याच्या प्रयत्नात असतो. एका यशस्वी फलंदाजाला याच गोष्टी करण्याची गरज असते.”
बेंगलोर विरुद्धच्या सामन्यातील सूर्यकुमारची कामगिरी
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध झालेल्या सामन्यात सूर्यकुमारने अफलातून फलंदाजी केली होती. या सामन्यात बेंगलोरने प्रथम फलंदाजी करताना मुंबईला १६५ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना सुर्यकुमारने ४३ चेंडूत नाबाद ७९ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने १० चौकार आणि ३ षटकार मारले. त्याच्या खेळीमुळे मुंबईने १९.१ षटकातच १६६ धावा करत सामना ५ विकेट्सने जिंकला.
महत्त्वाच्या बातम्या-
सुर्यकुमार यादव दुसऱ्या देशाकडून खेळणार? ‘या’ माजी क्रिकेटपटूच्या ट्वीटनंतर चर्चेला उधाण
“निवडकर्त्यांनी सूर्यकुमारची खेळी पहिली असावी…” माजी दिग्गजाने निवड समीतीला फटकारले
विराटला विराटच्याच भाषेत सुर्यकुमार यादवने दिले उत्तर, पाहा व्हिडीओ
ट्रेंडिंग लेख-
राजस्थानच्या ‘या’ ५ धुरंधरांची दमदार खेळी पडली पथ्यावर; ७ विकेट्सने पंजाब चितपट
सीके नायडूंनी ८८ वर्षांपूर्वी मारला होता ‘तो’ ऐतिहासिक षटकार
…आणि १५ वर्षांपूर्वी ‘त्या’ खेळीने धोनी भारतीय चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनला