ट्रॅव्हिस हेड (152) आणि स्टीव्ह स्मिथ (101) यांची शतकी खेळी आणि दोघांमध्ये चौथ्या विकेटसाठी झालेली 241 धावांची भागीदारी याच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं गाबा कसोटीत मोठी आघाडी मिळवली आहे. दुसऱ्या दिवशी त्यांनी 7 विकेट गमावून 405 धावा केल्या. भारतासाठी जसप्रीत बुमराहनं 25 षटकात 72 धावा देत 5 विकेट घेतल्या. दिवसाचा खेळ संपला तेव्हा ॲलेक्स कॅरी 45 आणि मिचेल स्टार्क 7 धावांवर खेळत आहेत.
या सामन्यात आतापर्यंत बुमराह वगळता भारताचा कोणताही गोलंदाज आपला प्रभाव टाकू शकला नाही. भारतीय गोलंदाजांच्या या कामगिरीवर ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज सायमन कॅटिचनं सडकून टीका केली आहे. गाबा कसोटीत भारतीय गोलंदाजांनी ट्रॅव्हिस हेडविरुद्ध जशाप्रकारे गोलंदाजी केली, त्यावर त्यांनी टीका केली आहे. कॅटिच यांनी, भारतीय गोलंदाज ‘मूर्खासारखं क्रिकेट’ खेळले, अशा शब्दांत हल्ला चढवला आहे.
सायमन कॅटिच यांची ही टिप्पणी 60 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूनंतर आली, जेव्हा मोहम्मद सिराजनं हेडला एक शॉर्ट बॉल टाकला. यावर हेडनं चेंडू सीमारेषेकडे पाठवला. सिराजची ही रणनीती पाहून कॅटिच नाखूष झाले. चॅनल 7 साठी समालोचन करताना ते म्हणाले, “मोहम्मद सिराजची ही गोष्ट अविश्वसनीय आहे. शेवटच्या षटकात त्यानं एका खेळाडूला योग्य ठिकाणी ठेवलं होतं आणि त्यानं धाव घेत गोलंदाजी केली, जी तो कोणत्याही क्षेत्ररक्षकाशिवाय करण्याचा विचार करत होता. हे मूर्खपणाचं आहे. त्याच्याकडे लेगसाइड, डीप पॉइंटवर दोन खेळाडू आहेत. ट्रॅव्हिस हेडसाठी एक खेळाडू त्याच पोझिशनवर आहे आणि नंतर त्याच्याकडे क्षेत्ररक्षक नाही. आता तो तिथे क्षेत्ररक्षक ठेवणार आहे.”
सायमन कॅटिच पुढे बोलताना म्हणाले, “भारतीय संघानं हेडसाठी डीप पॉईंटवर एक क्षेत्ररक्षक ठेवला होता. तसेच हेड क्रीझवर नुकताच आला असताना भारतीय गोलंदाजांनी त्याच्याविरुद्ध बाऊन्सर्सचा जास्त वापर केला नाही. डावखुरे फलंदाज क्रीजवर नवे असताना वेगवान गोलंदाजांविरुद्ध संघर्ष करतात हे सर्वांना माहित आहे. असं असूनही भारतानं हे धोरण अवलंबलं नाही.”
हेही वाचा –
रोहित-कोहलीपासून हार्दिक-बुमराहपर्यंत, भारताच्या स्टार क्रिकेटर्ससाठी 2024 हे वर्ष कसं राहिलं?
रोहित शर्मानं घेतला स्मिथचा अद्भुत कॅच, व्हिडिओ पाहिल्याशिवाय विश्वासच बसणार नाही!
ट्रॅव्हिस हेड पुन्हा डोकेदुखी, स्मिथनं संपवला शतकाचा दुष्काळ; असा राहिला गाबा कसोटीचा दुसरा दिवस