पुणे। सिमरन धिंग्रा, शांभवी तेवारी, शर्वा बेद्रे, सान्वी राणे यांनी महाराष्ट्रीय मंडळाच्या वतीने आयोजित हौशी खेळाडूंच्या जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलींच्या गटातून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
जोशीज बॅडमिंटन क्लब, देवधर बॅडमिंटन अकॅडमीच्या सहकार्याने व पुणे जिल्हा बॅडमिंटन संघटनेच्या मान्यतेने होत असलेली ही स्पर्धा टिळक रस्त्यावरील भोपटकर हॉलमध्ये सुरू आहे. या स्पर्धेतील १७ वर्षांखालील मुलींच्या एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत सिमरन धिंग्राने मिली निबजियावर १५-३, १५-७ असा, तर शांभवीने आर्या मुळीकवर १५-९, १५-४ असा विजय मिळवला.
यानंतर शावार्ने वैष्णवी पिसेवर १५-१३, १५-७ अशी, तर सान्वीने सई पळशिकरवर १५-१३, १५-७ अशी मात केली. यानंतर १७ वर्षांखालील मुलांच्या गटात अथर्व अलवानीने पार्थ कोरगावकरचा १५-१३, १५-१२ असा, तर अर्णव निकमने आकाश कपाडियाचा १५-६, १५-७ असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
आर्या, ख्याती, रिद्धीमा, सोयरा उपांत्य फेरीत।
स्पर्धेतील ११ वर्षांखालील मुलींच्या गटात आर्या कुलकर्णी, ख्याती कात्रे, रिद्धीमा जोशी, सोयरा शेलार यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत आयार्ने श्रावणी अर्डेवर १५-८, १५-१ अशी, तर ख्याती कात्रेने सानिका देशपांडेवर १५-६, १९-१७ अशी मात केली. यानंतर रिद्धीमा जोशीने आलिया सोनीवर १५-१०, १५-९ असा, तर सोयराने रूमानी देवधरवर १५-८, १८-१६ असा विजय मिळवला.
नील, राघवेंद्रची आगेकूच।
यानंतर स्पधेर्तील ११ वर्षांखालील मुलांच्या गटात नील जोशी राघवेंद्र यादव, विराज सराफ यांनी उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला. उपांत्यपूर्व फेरीत नीलने अथर्व काळेवर १५-३, १५-१ असा, तर राघवेंद्रने रोहन सायनकरवर १५-१०, १५-७ असा विजय मिळवला. यानंतर विराज सराफने आर्यन निबेवर १५-०, १५-६ अशी मात केली, तर अर्चित व्यासने समीहन देशपांडेचे आव्हान १५-८, १२-१५, १५-११ असे परतवून लावले.
केविन पटेल उपांत्य फेरीत।
स्पर्धेतील १३ वर्षांखालील मुलांच्या गटात केविन पटेलने निक्षेप कात्रेवर ७-१५, १५-१०, १५-११ अशी मात करून विजय मिळवीत उपांत्य फेरी गाठली.