शुक्रवार (३० जुलै) हा दिवस टोकियो ऑलिंपिक्समध्ये भारतासाठी चांगला ठरला आहे. मात्र, बॉक्सिंगमध्ये भारताला निराशा पत्करावी लागली. महिला बॉक्सिंगमध्ये ६० किलो वजनी गटातील राऊंड १६ मधील सामना भारत आणि थायलंड संघात झाला. यामध्ये भारताकडून सिमरनजीत कौर आणि थायलंडकडून सुदापोर्न सीसोंडी हे आमने- सामने होते. हा सामना सुदापोर्नने ५-० ने जिंकला.
यावेळी पहिल्या राऊंडमध्ये सिमरनजीत पराभूत झाली. परीक्षकांनी सर्व गुण सुदापोर्नला दिले. त्यानंतर दुसऱ्या राऊंडमध्येही सिमरनजीतला पराभव मिळाला. परीक्षकांनी १० च्या १० गुण सुदापोर्नला दिले. (Simranjit Kaur lost Round of 16 match and fails to qualify for Quarterfinals)
NOT OUR DAY 🙌🏻🙇🏿♂️
Playing her maiden #Olympics @Simranjitboxer goes down 0-5 against 🇹🇭's Sudaporn S in Round of 16 match of @Tokyo2020 #RingKeBaazigar#boxing#Tokyo2020#Cheer4India#TeamIndia pic.twitter.com/WpffdHleC5
— Boxing Federation (@BFI_official) July 30, 2021
आपला पहिलाच ऑलिंपिक सामना खेळत असलेली सिमरनजीत तिसऱ्या राऊंडमध्येही पराभूत झाली. तिला उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवता आला नाही आणि तिचा ऑलिंपिकमधील प्रवास इथेच संपला आहे.
ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-