सिंगापूर ओपन स्पर्धेत भारताची स्टार बॅटमिंडनपटू पीव्ही सिंधू महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत पोहोचली आहे. शुक्रवारी (१५ जुलै) झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात तिने चीनच्या हान युई हिचा १७-२१, २१-११, २१-१९ असा दोन सेटमध्ये पराभव केला आहे. दोन वेळेची ऑलम्पिक विजेती सिंधूला चीनच्या या खेळाडूने चांगलाच त्रास दिला. ६२ मिनिटे चाललेल्या या सामन्यात तिसरे मानांकन असलेली सिंधूच अखेर विजेती ठरली आहे.
या सामन्यातील पहिल्या सेटमध्ये १५-१५ अशी बरोबरी साधल्यानंतर सिंधू थोडी मागे राहिली. यामुळे पहिला सेट हानने आपल्या नावे केला. दुसऱ्या सेटमध्ये आक्रमक खेळ करत तिने सलग ७ अंक मिळवत सेट २१-११ असा सहज जिंकला. या सेटमध्ये केलेला तिचा खेळ इतका प्रभावशाली होता की, विरोधी खेळाडूही आश्चर्यचकित झाली. दोघींनीही एक-एक सेट जिंकल्याने तिसऱ्या सेटमध्ये चढाओढ दिसली. यावेळ हान हीने काहीशी आघाडी घेतली होती. यावेळी सिंधूने तिचा सर्व जोर पणाला लावत उत्तम नेट शॉट्स खेळत महत्वाचा सेट जिंकत पुढच्या फेरीत स्थान पक्के केले आहे.
सध्या पीव्ही सिंधू (PV Sindhu) ही जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर आहे. या दोघी आतापर्यंत तीन वेळा आमने-सामने आल्या असून त्या तिन्ही सामन्यात सिंधूच वरचढ ठरली आहे. थायलंड ओपननंतर सिंधूची ही पहिलीच उपांत्य फेरी ठरली आहे. तिचा हा फॉर्म कॉमनवेल्थ गेम्ससाठी उपयोगाचा ठरणार आहे. ही स्पर्धा २८ जुलैपासून बर्मिंघम येथे खेळली जाणार आहे.
Singapore Open 2022
WS – Quarter final
17 21 21 🇮🇳V. Sindhu PUSARLA🏅
21 11 19 🇨🇳Yue HAN🕗 in 62 minutes
https://t.co/L4FJM8KDEv— BWFScore (@BWFScore) July 15, 2022
पुढच्या सामन्यात सिंधूचा सामना बिगर मानांकित साईना कावाकामी हिच्याशी होणार आहे. जपानची ही खेळाडू जागतिक क्रमवारीत ३८व्या स्थानावर आहे. तिने मागील सामन्यात सहाव्या मानांकित पोर्न्पावी चोचूवोंगचा २१-१७, २१-१९ असा पराभव केला आहे.
या स्पर्धेत सिंधू बरोबर भारताचे सायना नेहवाल आणि एचएस प्रणोय हे पण सहभागी झाले होते. मात्र नेहवालचा उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या आया ओहेरीने १३-२१, २१-१५, २०-२२ असा पराभव झाल्याने ती स्पर्धेबाहेर पडली आहे. तसेच फॉर्ममध्ये असलेला प्रणोय पहिला सेट जिंकला होता मात्र दुसऱ्या सेटमध्ये त्याला कोडाई नाराओकाने बाजी मारली. उपांत्यपूर्व फेरीच्या या सामन्यात नाराओकाने त्याचा १२-२१, २१-१४, २१-१८ असा पराभव केला आहे.
या स्पर्धेत भारताची जोडी एमआर अर्जुन आणि ध्रुव कपिला यांनाही उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यांना मोहम्मद अहसान-हेंड्रा सेटियावान यांनी १०-२१, २१-१८, २१-१७ असे पराभूत केले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘या’ ४ भारतीय दिग्गजांप्रमाणे खराब फॉर्मशी झगडत असलेला विराटही अचानक टाकणार निवृत्तीचा ‘बॉम्ब’!
लॉर्ड्स वनडेत ‘हे’ पाच जण ठरले विलन, भारताच्या लाजिरवाण्या पराभावासाठी आहेत कारणीभूत
Video: भर मैदानात निखळला रोहित शर्माचा खांदा, पण त्यानंतर जे घडले ते अविश्वसनीय होते