---Advertisement---

‘त्या’ जाहिरातीमुळे रिषभ पंतवर प्रसिद्ध गायिकेची आगपाखड; म्हणाल्या, ‘तू मूर्खासारखा दिसतोस’

On: शनिवार, डिसेंबर 10, 2022 1:45 PM
Kaushiki-Chakraborty-And-Rishabh-Pant
---Advertisement---

भारतीय क्रिकेटपटू कोणत्याही कारणामुळे चर्चेचा विषय ठरू शकतात. कधी ते त्यांच्या नवीन गाडी किंवा घरामुळे, तर कधी ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत येत असतात. अशात भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत हा भलताच चर्चेत आहे. यामागील कारण ठरलंय त्याची एक जाहिरात. त्याच्या जाहिरातीमुळे प्रसिद्ध शास्त्रीय गायिका कौशिकी चक्रवर्ती यांनी रिषभ पंतवर आगपाखड केली आहे. त्यांनी पंतला थेट ‘तू मूर्खासारखा दिसतो’ असे म्हटले आहे.

का भडकल्या कौशिकी चक्रवर्ती?
झाले असे की, रिषभ पंत (Rishabh Pant) याच्या टीव्हीवर जाहिराती दाखवल्या जातात. त्यातील ड्रीम 11 (Dream 11) यावर त्याची एक जाहिरात आहे. त्यात तो आयुष्यात क्रिकेटपटू झाला नसता, तर काय केले असते असे म्हणताना दिसतो. त्यात पंत शास्त्रीय गायकाच्या भूमिकेत दिसला आहे. मागील काही दिवसांपासून ही जाहिरात टीव्हीसोबतच सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरलल होत आहे. त्यावरूनच कौशिका चक्रवर्ती (Kaushiki Chakraborty) या भडकल्या आहेत. त्यांनी पंतला खडेबोल सुनावले आहेत.

पंतच्या जाहिरातीत आहे तरी काय?
रिषभ पंतने या जाहिरातीचा व्हिडिओ त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला होता. त्यात तो म्हणतो की, “मी क्रिकेटपटू झालो नसतो तर…” असे म्हणताच तो शास्त्रीय गायकाच्या रूपात दिसतो. यानंतर तो माईकच्या समोर बसताच यष्टीरक्षकासारखे उभे राहून कानाला हात लावून ओरडताना दिसतो.

कौशिकी चक्रवर्ती यांचे ट्वीट
अशात कौशिकी चक्रवर्ती यांनी पंतचा व्हिडिओ रिट्विट करत लिहिले की, “या जाहिरातीचा तिरस्कार करते. कुरूपता व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. वारशाचा अनादर केल्यामुळे तू मूर्खासारखा दिसतो. हे संगीत पंडित रविशंकर, उस्ताद झाकीर हुसेन, पंडित भीमसेन जोशी यांचे आहे. मला खात्री आहे की, असे करून तू पैसा कमावला असेल, परंतु ते योग्य आहे का?”

गायिका कौशिकी यांच्या वक्तव्याचे नेटकरी समर्थन करताना दिसत आहेत. एका युजरने म्हटले की, “तेच तर, पहिल्यांदा ही जाहिरात टीव्हीवर पाहिल्यानंतर माझी अशीच प्रतिक्रिया होती. ही आमच्या वारशाचा अनादर करणारी जाहिरात आहे.”

अशाप्रकारे नेटकरी त्यांना पाठिंबा दर्शवताना दिसत आहेत. दुसरीकडे, रिषभ पंत याच्यावर टीकाही करत आहेत. (singer kaushiki chakraborty angry on cricketer rishabh pant know all about)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘विराट, राहुल अन् रोहितने तीन वर्षात किती शतके ठोकली?’, भारताच्या विश्वविजेत्या खेळाडूचा तिखट प्रश्न
टीम इंडियाला नडणाऱ्या पठ्ठ्याने सोडली इंग्लंडची साथ; ‘या’ देशासाठी खेळणार आंतरराष्ट्रीय क्रिकेट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---