६६व्या वरिष्ठ गट पुरुष व महिला महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद व निवडचाचणी कबड्डी स्पर्धेचे आयोजन इतके दर्जेदार सिन्नरकरांनी करावे की ह्या स्पर्धा सगळ्यांच्या कायमस्वरूपी लक्षात राहतील. असे मत सिन्नर विधानसभेचे आमदार राजाभाऊ वाजे यांनी स्पर्धेच्या मैदानाच्या भूमिपूजन कार्यक्रमा प्रसंगी व्यक्त केले.
कार्यक्रमा प्रसंगी जिल्हा परिषद नाशिकच्या अध्यक्षा शितलताई सांगळे,नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष जयंतराव जाधव,प्रमुख कार्यवाह मोहन गायकवाड, महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे सहकार्यवाह प्रकाश बोराडे,आयोजन समितीचे अध्यक्ष उदय सांगळे,सिन्नर नगरपालिकेचे अध्यक्ष किरण डगळे,आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षिका शैलजा जैन,राष्ट्रीय कबड्डी पट्टू सागर बांदेकर आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन रविवार दिनांक २१ ऑक्टोबर रोजी सिन्नर येथील आडवा फाटा मैदानावर सकाळी ११ वाजता करण्यात आले होते.
६६ व्या वरीष्ठ गट पुरुष व महिला राज्य अजिंक्य पद व निवडचाचणी स्पर्धेचे आयोजन ३१ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर दरम्यान सिन्नर येथील आडव्या फाटा मैदानावर करण्यात आले आहे. सदर स्पर्धेत राज्यभरातून ६०० खेळाडु सहभागी होणार आहेत. स्पर्धे साठी मातीचे सहा कबड्डीचे मैदाने तयार करण्यात येणार असून १०,००० प्रेक्षक क्षमतेची प्रेक्षक गॅलरी उबरण्यात येणार आहे. स्पर्धेच्या मैदानाची तयारी सुरू झाली आहे.
भूमीपूजन कार्यक्रमा प्रसंगी जयंतराव जाधव यांनी या स्पर्धा आयोजित करताना खेळाडू केंद्रस्थानी मानुन निवास ,भोजन, मैदान व्यवस्था उत्तम करावी खेळाडू त्याचा दर्जेदार खेळ दाखवू शकतो असे मत व्यक्त केले. स्पर्धेच्या पालक जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितलताई यांनी असे सांगितले की हा बहुमान माझ्या कारकीर्द जिल्हा परिषदेला मिळाला हे मी माझे भाग्य समजते. जिल्हा परिषद व सह्याद्री युवा मंच सिन्नर, खेळाडूंना काही कमी पडू देणार नाही व स्पर्धा नक्कीच दर्जेदार होतील असे आश्वासन दिले. स्पर्धेचे मुख्य संयोजक उदय सांगळे यांनी सर्धेच्या आयोजना बद्दल माहिती दिली.
महत्त्वाच्या बातम्या:
–६६ वी वरिष्ठ गट पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेबद्दल सर्वकाही…
–विराट की धोनी? कोण करणार वन-डेत १० हजार धावा आधी
–रोहित हिटमॅन शर्माने केला क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम; गांगुली, सचिनलाही टाकले मागे