सध्या भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडीजमध्ये आहे. नुकतीच उभय संघातील वनडे मालिका समाप्त झाली. यात भारतीय संघाने निर्भळ यश मिळवले. हे सर्व सामने त्रिनिदादमधील पोर्ट ऑफ स्पेन येथील ब्रायन लारा स्टेडियमवर खेळले गेले. या तिन्ही सामन्यात वेस्ट इंडीज संघाला पराभव पत्करावा लागला. मात्र, त्यानंतर आता वेस्ट इंडीजचे एक दिग्गज वेगवान गोलंदाज चांगलेच संतापले आपले आहेत. त्रिनिदादमध्ये भारतीय संघाचे जास्त सामने आयोजित करू नयेत असा सल्ला देखील त्यांनी दिला
वेस्ट इंडीजचे दिग्गज वेगवान गोलंदाज राहिलेल्या ऍंडी रॉबर्ट्स यांनी एका क्रिकेट संकेतस्थळाशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली. रॉबर्ट्स म्हणाले,
“आम्ही खेळत होतो तेव्हा भारताविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांपैकी कमीत कमी दोन सामने तरी त्रिनिदादमध्ये खेळले जायचे. कारण, ते सामने पाहण्यासाठी खूप लोक यायचे. त्यावेळी टीव्ही नव्हता आणि बहुतेक चाहते स्टेडियममध्ये जाऊन सामना पाहत असत. त्यातून अधिक महसूलही मिळायचा. मात्र आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. आता टीव्हीच्या माध्यमातूनच अधिक महसूल येतो. तरीही, त्रिनिदाद आणि गयानामध्ये अधिक सामने होतात.
रॉबर्ट्स पुढे म्हणाले की, “त्रिनिदाद आणि गयाना या दोन्ही देशांमध्ये भारतीय लोकसंख्या अधिक आहे. याव्यतिरिक्त दुसरे कोणतेही कारण नाही, ज्याच्यामुळे आपण येथे अधिक सामने आयोजित करतो. भारतीय संघ जेव्हा जेव्हा इथे येते तेव्हा ते, त्रिनिदाद किंवा गयानामध्ये नक्कीच खेळतात. बांगलादेश संघासहही तीच स्थिती आहे.”
उभय संघातील संपूर्ण वनडे मालिका पोर्ट ऑफ स्पेन येथेच खेळली गेली. त्यानंतर आता टी२० मालिकेतील पहिला सामना देखील याच ठिकाणी खेळला जाणार आहे. त्यानंतर दोन सामने सेंट किट्स येथे आयोजित केले जातील. अखेरचे दोन सामने मात्र अमेरिकेतील फ्लोरिडा या ठिकाणी खेळले जाणार आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
कर्णधार ‘गब्बर’ ठरतोय माहीपेक्षाही वरचढं?, केलीये ‘या मोठ्या विक्रमाची बरोबरी