आयपीएल २०२२चा पहिला एलिमिनेटर सामना बुधवारी (दि. २५ मे) रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स संघात होणार आहे. या सामन्यापूर्वी गुजरात टायटन्सविरुद्धच्या शेवटच्या साखळी संघात स्थान न मिळालेल्या मोहम्मद सिराजच्या निवडीची चर्चा आहे. त्याच्या जागी समाविष्ट करण्यात आलेल्या सिद्धार्थ कौलची हकालपट्टी करून सिराजला पुन्हा संधी दिली जाणार का, असा प्रश्न सर्वांच्याच मनात आहे. भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागनेही याबाबत आपले मत व्यक्त केले आहे.
“विराट कोहलीची (Virat Kohli) साथ मिळाली तरच मोहम्मद सिराजचे (Mohammad Siraj) पुनरागमन होऊ शकते, असे विरेंद्र सेहवागचे (Virender Sehwag) मत आहे. सेहवागचे पुढे म्हणाला की, “आरसीबीने विजयी संघाला खेळवले पाहिजे. मात्र, विराट कोहलीने हस्तक्षेप केल्यास यामध्ये बदल दिसून येऊ शकतो.”
सिराजच्या जागी संघात समाविष्ट करण्यात आलेल्या सिद्धार्थ कौलची (Siddharth Kaul) कामगिरीही विशेष नव्हती. त्याने चार षटकात एकही विकेट न घेता 43 धावा दिल्या. आरसीबीने सामना जिंकला असला तरी खराब गोलंदाजीचा विचार आरसीबीच्या संघाला करावा लागेल. त्यामुळे गोलंदाजीत सुधार आणण्यासाठी काही बदल केले जाऊ शकतात, असेही सेहवागने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, या हंगामात सिराजने 13 सामन्यात 9.82 च्या इकॉनॉमीने धावा देत आठ विकेट घेतल्या आहेत. त्याची गोलंदाजीची सरासरी ५५.२५ आहे. त्यामुळे सिराज देखील या हंगामात चांगली गोलंदाजी करण्यास अपयशी ठरल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येते. तरीही एलिमिनेटर सारख्या महत्त्वाच्या सामन्यात त्याच्या अनुभवाचा वापर करून घेण्यासाठी त्याला संघात घेतले जाऊ शकते.
महा स्पोर्ट्सच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल २०२२च्या फायनलमध्ये दिमाखात पोहोचली नवखी टीम गुजरात टायटन्स, ‘या’ खेळाडूंचे आहे मोलाचे योगदान
आयपीएल फायनलला अजून चार दिवस बाकी, मग काय करणार? पाहा गुजरातच्या ट्वीटवर काय म्हणाला राशिद खान
बटलरच्या वादळी खेळीने रचला जबरदस्त विक्रम; ठरला आयपीएलच्या इतिहासातील सातवाच फलंदाज