भारतात सध्या आयपीएलचा १४ वा हंगाम सुरु आहे. मैदानाबाहेर कोरोना महामारीची दुसरी लाट आलेली असताना, मैदानावर मात्र सातत्याने विक्रमांचा पाऊस पडताना दिसत आहे. याचाच प्रत्यय प्रेक्षकांना गुरुवारी (दि. २९ एप्रिल) पुन्हा एकदा आला. अहमदाबादेत रंगलेल्या दिल्ली वि. कोलकाता संघांच्या सामन्यात अनेक विक्रमांची बरसात झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र, यात सर्वात महत्वाचा आणि अविस्मरणीय रेकॉर्ड नोंदवला गेला तो पृथ्वी शॉच्या नावावर.
कोलकाता संघाने दिलेल्या १५५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीचे पृथ्वी शॉ आणि शिखर धवन हे दोन्ही सलामीवीर मैदानावर उतरले. मैदानावर उतरलेल्या पृथ्वी शॉने पहिल्याच ओव्हरमध्ये थेट हल्ला चढवला. आणि त्याचा हा हल्ला थांबला तेव्हा मात्र आयपीएलच्या इतिहासातील ‘पहिलाच’ असा रेकॉर्ड नोंदवला गेला. काय होता हा रेकॉर्ड तर पाहुयात सविस्तरपणे…
शिवम मावीची गोलंदाजी आणि पृथ्वी शॉची तळपलेली बॅट…
पृथ्वी शॉने १४ व्या हंगामात सातत्याने चांगली कामगिरी केली. त्यामुळे कोलकाताविरुद्ध देखील त्याची कामगिरी चांगलीच राहिल, हा सर्वांना विश्वास होता. हा विश्वास पृथ्वीने पहिल्याच ओव्हरमध्ये सार्थकी लावला. शिवम मावीचे पहिले षटक जे की सामन्यातील दुसऱ्या डावातील पहिलेच षटक होते. त्या षटकाचा पहिला चेंडू वाईड गेल्यानंतर पृथ्वीने त्याच्या फलंदाजीचे उत्तम प्रदर्शन दाखवत ‘लागोपाट ६ चेंडूंवर ६ नयनवेधक चौकार खेचले’. त्याच्या या नजाकत भरलेल्या खेळीने आणि विक्रमी कामगिरीने काहीकाळ मैदानावरील वातावरण स्तब्ध झाल्याचे पाहायला मिळाले.
Wd, 4, 4, 4, 4, 4, 4@PrithviShaw 24 (6) has set the stage on 🔥
Six boundaries in the 1st over bowled by Mavi.😳https://t.co/iEiKUVwBoy #DCvKKR #VIVOIPL pic.twitter.com/5ISeFsKWA0— IndianPremierLeague (@IPL) April 29, 2021
आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले….
पृथ्वीने डावाच्या पहिल्या षटकात ठोकलेले सहा चौकार हा आयपीएलच्या इतिहासातील एक विक्रम असून असं पहिल्यांदाच घडलं. या अगोदर आयपीएलमध्ये सहा चेंडूत सहा चौकार अजिंक्य रहाणेने लगावले होते. मात्र, ते चौकार डावातील १४ व्या षटकात लगावले गेले होते. मात्र, पृथ्वी शॉने डावाच्या पहिल्याच षटकातील सहाही चेंडूंवर चौकार ठोकत आयपीएलच्या इतिहासात स्वतःचे नाव कोरले आहे.
https://twitter.com/lodulalit001/status/1387799859869011970?s=20
आयपीएल २०२१ चे सर्वात जलद अर्धशतक…
आयपीएल २०२१ च्या कोलकाता विरुद्ध दिल्लीच्या या सामन्यात पृथ्वी शॉने आणखीन एक विक्रम स्वतःच्या नावाकर केला. तो म्हणजे गुरुवारी कोलकाता विरुद्धच्या त्या सामन्यापर्यंत पृथ्वी हा २०२१ मध्ये सर्वात कमी चेंडूत अर्धशतक (१८ चेंडूत) झळकावणारा पहिलाच खेळाडू होता.
5️⃣0️⃣🔥
There is no stopping @PrithviShaw. This is sensational batting. He brings up his half-century in 18 balls flat. It is the fastest in #IPL2021. 🙌🏾https://t.co/iEiKUVwBoy #DCvKKR #VIVOIPL pic.twitter.com/jj6ZKFw2s8
— IndianPremierLeague (@IPL) April 29, 2021
पृथ्वीच्या खेळीने दिल्लीची झाली सरशी….
पृथ्वीने या सामन्यात एकूण ४१ चेंडूत ८२ धावा केल्या. त्याच्या या वादळी अर्धशतकाच्या जोरावर आणि त्याचा सलामीचा साथीदार शिखर धवन याच्या ४६ धावांच्या जोरावर पुढे जाऊन दिल्लीने कोलकातावर ७ विकेट्स राखून मात केली. पृथ्वीच्या या खेळीच्या जोरावर त्याला सामनावीर म्हणून देखील गौरवण्यात आले.