आयपीएल 2023 हंगामत एकूण 70 सामने खेळले जाणार असून 35वा सामना मंगळवारी (25 एफ्रिल) संपला. चालू आयपीएल हंगामातील पूर्वार्धातील शेवटचा सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात पार पडला. मुंबईला तब्बल 55 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. हंगामातील पूर्वार्धात सर्वोत्तम प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंवर आपण या लेखात नजर टाकणार आहोत.
आयपीएल 2023च्या पूर्वार्धात सर्वाधिक धावांचा विक्रम रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिस (IPL 2023) याने केल्या आहेत. आरसीबीचे नेतृत्व करताना डू प्लेसिसने आपल्या फलंदाजीवर जराही परिणाम होऊ दिला नाहीये. त्याने आतापर्यंत खेळलेल्या सात सामन्यांमध्ये 405 धावा कुटल्या आहेत. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज सलामीवीर डेविड वॉर्नर सध्या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करत आहे. वॉर्नने चालू हंगामात आतापर्यंत एकूण 256 धावा केल्या आहेत आणि सर्वाधिक चेंडू खेळणारा फलंदाज देखील तोच आहे.
त्याचसोबत वॉर्नने चालू हंगामात सर्वाधिक 5 वेळा 30 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी केली आहे. यादीत पुढचे नावर पुन्हा फाफ डू प्लेसिस याचेच आहे. त्याने चालू हंगामातल सर्वाधिक पाच अर्धशतके केली आहेत. आयपीएल 2023 मध्ये सर्वाधिक शतकांचा विचार केला, तर वेंकटेश अय्यर आणि हॅरी ब्रुक यांची नावे आहेत. या दोघांनीही चालू हंगामात प्रत्येकी एक-एक शतक केले आहे. शिखर धवनने हंगामातील पूर्वार्धात 77.6 धावांची सर्वोत्तम सरासरीने राखली आहे. तर सीएसकेसाठी पहिल्यांदाच खेळणाऱ्या अजिंक रहाणेने 199.05च्या सर्वोत्तम स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. हंगामात सर्वाधिक चौकार वॉर्नरच्या (44), तर सर्वाधिक षटकार फाफ डू प्लेसिस (25) याच्या नावावर आहे. (Six players who performed best in the first half of IPL 2023)
आयपीएल 2023च्या पूर्वार्धात सर्वोत्तम प्रदर्शन करणारे खेळाडू
सर्वाधिक धावा – फाफ डू प्लेसिस (405)
सर्वाधिक चेंडू खेळले – डेविड वॉर्नर (256)
सर्वाधिक वेळा 30धावांची खेळी – डेविड वॉर्नर (5)
सर्वाधिक अर्धशतके- फाफ डू प्लेसिस (5)
सर्वाधिक शतके – वेंकटेश अय्यर/ हॅरी ब्रुक (प्रत्येकी एक-एक)
सर्वोत्तम सरासरी – शिखर धवन (77.6)
सर्वोत्तम स्ट्राईक रेट – अजिंक्य रहाणे (199.05)
सर्वाधिक चौकार – डेविड वॉर्नर (44)
सर्वोत्तम षटकार – फाफ डू प्लेसिस (25)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धक्कादायक! रिंकूकडून 5 षटकार खाणारा गुजरातचा खेळाडू आजारी, 8 किलो वजनही उतरलं; पंड्याचा मोठा खुलासा
अर्जुन तेंडुलकरविषयी न्यूझीलंडच्या दिग्गजाचे खळबळजनक वक्तव्य; म्हणाला, ‘रोहितलाही माहितीये…’