भारताचा सलामीवीर केएल राहुलने एक खास विक्रम केला आहे. त्याने सलग ६ कसोटी डावात अर्धशतक करण्याचा विक्रम केला आहे.
भारतीय खेळाडूने सलग ६ डावांत अर्धशतक किंवा त्यापेक्षा जास्त धावा करण्याचा हा विक्रम आता संयुक्तपणे केएल राहुल (२०१७), गुंडाप्पा विश्वनाथ (१९७७-७८) आणि राहुल द्रविड (१९९७-९८) यांच्या नावावर आहे.
त्याने खेळलेल्या मागील ८ डावात ७व्यांदा अर्धशतकी खेळी आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध पुणे कसोटी (६४ आणि १०), बेंगुलरू (९० आणि ५१), रांची (६७), धरमशाला (६० आणि ५१*) आणि श्रीलंके विरुद्ध कोलंबो (५०*) अशा या खेळी आहेत.