---Advertisement---

सलूनमध्ये काम करणाऱ्याच्या मुलाचा सोशल मीडियावर राडा; मिळाली थेट ‘मास्टर ब्लास्टर’सोबत प्रॅक्टिस करण्याची संधी

On: शुक्रवार, मार्च 11, 2022 9:21 PM
Sachin-Tendulkar
---Advertisement---

सचिन तेंडुलकरला कोणत्याही परिचयाची आवश्यकता नाही. सचिनने त्याच्या कारकिर्दीत केलेल्या अविस्मरणीय विक्रमांमुळे तो चाहत्यांची प्रेरणा आहे. चाहते त्याला भेटण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. अशातच एका ५ वर्षीय चिमुकल्या मुलाचे हे स्वप्न पूर्ण झाले आहे. इतकेच नाही, तर त्याने सचिनसोबत सरावही केला. त्यांचा यादरम्यानचा व्हिडिओही तुफान व्हायरल होत आहे. अशात त्या ५ वर्षांच्या चिमुकल्याबद्दल जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. या लेखातून आपण त्याबद्दल जाणून घेऊया…

सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत सचिन तेंडुलकरसोबत (Sachin Tendulkar) दिसणाऱ्या चिमुकल्या मुलाचे नाव एसके शाहिद (SK Shahid) आहे. त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, जो पाहून भले-भले खेळाडूही थक्क झाले होते. दिवंगत फिरकीपटू शेन वॉर्ननेही (Shane Warne) पाहिला होता.

अवघ्या ५ वर्षांच्या शाहिदच्या फलंदाजीचा व्हिडिओ त्याच्या आई-वडिलांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. यानंतर फक्त लाखो युजर्सनेच त्याचे तोंडभरून कौतुक तर केलेच. मात्र, त्यासोबतच त्याचा आदर्श सचिन तेंडुलकरसोबतही त्याला काही दिवस सराव करण्याची संधी मिळाली. शाहिदचे वडील एका कटीनच्या दुकानात काम करतात.

शेन वॉर्ननेही या मुलाला शुभेच्छा दिल्या होत्या. वॉर्नचे गेल्या आठवड्यात थायलंडमध्ये निधन झाले. या व्हिडिओने शाहिदचा आदर्श असलेल्या सचिनचेही लक्ष वेधून घेतले. त्यानंतर काही दिवसांत कोलकात्यात राहणाऱ्या शाहिदला मुंबईतील तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल अकादमीमध्ये सराव करण्याची संधी मिळाली. खुद्द सचिनने या युवा फलंदाजाला काही गोष्टींचे धडे दिले.

शाहिदचे वडील शेख शमशेर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “माझा मुलगा ५ वर्षांचा आहे. सचिन सर हे त्याचे आदर्श असून त्यांना भेटण्याचे त्याचे स्वप्न होते. त्याला क्रिकेटर बनायचे आहे. फक्त त्यांना पाहणं हे त्याचं स्वप्न होतं, पण सचिन सरांनी जे केलं, त्याबद्दल धन्यवाद. त्यासाठी शब्दही कमी आहेत.”

पुढे बोलताना ते म्हणाले की, “आम्ही आमच्या ट्विटर हँडलवर व्हिडिओ अपलोड केला होता, जो ऑस्ट्रेलियन चॅनल फॉक्स स्पोर्ट्सने देखील ट्वीट केला. त्यात तेंडुलकर, इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन आणि दिवंगत शेन वॉर्न यांना टॅग केले होते. आम्हाला वाटते की, सचिनने तो व्हिडिओ पाहिला आणि त्यानंतर त्यांच्या टीम सदस्याने आमच्याशी संपर्क साधला.”

सचिन तेंडुलकरने शाहिद आणि त्याच्या कुटुंबाच्या मुंबई प्रवासाचा सर्व खर्च उचलला आणि त्यांची राहण्याची व्यवस्था एका गेस्ट हाऊसमध्ये केली. आपल्या मुलाने व्यावसायिक प्रशिक्षण घ्यावे, अशी शाहिदच्या वडिलांची इच्छा होती. त्यांची ती इच्छा सचिनने पूर्ण केली.

महत्त्वाच्या बातम्या-

अफलातून! पाकिस्तानी महिला विकेटकीपरचा ‘अद्भूत’ झेल; चाहत्यांंना आली थेट ‘माही’च्या ‘त्या’ कॅचची आठवण

दिवस-रात्र कसोटीच्या प्लेइंग इलेव्हनमधून ‘या’ गोलंदाजाला नारळ? सिराज किंवा अक्षरची लागेल वर्णी

दिवस-रात्र कसोटीच्या प्लेइंग इलेव्हनमधून ‘या’ गोलंदाजाला नारळ? सिराज किंवा अक्षरची लागेल वर्णी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---