‘क्रिकेट’ हा असा खेळ आहे, जिथे जिद्द आणि मेहनत असेल तर फळ मिळणारच. असे अनेक खेळाडू आहेत ज्यांनी परिस्थितीवर मात करत छोट्या शहरातून येऊन क्रिकेटमध्ये आपले नाव उंचावले आहे. यात एमएस धोनीसारख्या दिग्गज क्रिकेटपटूचा समावेश आहे. धोनीने रांचीसारख्या छोट्या शहरातून येऊन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. असाच एक खेळाडू जम्मू काश्मीर संघात समाविष्ट झाला आहे.
केंद्रशासित प्रदेश लडाखमधून ‘स्कालजांग दोर्जे’ हा जम्मू काश्मीर संघामध्ये प्रवेश करणारा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. स्कालजांग दोर्जेने दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे की, “क्रिकेटर होण्याआधी तो भिक्षू होता. तसेच त्याने शारीरिक शिक्षणाच्या शिक्षकाची देखील नोकरी केली आहे. तसेच तो गिर्यारोहकांना प्रशिक्षण देखील देत असे.” यावरून आपण अंदाज घेऊ शकतो की, त्याने क्रिकेटमध्ये येण्यापूर्वी प्रचंड मेहनत घेतली आहे.
तसेच त्याच्या आयुष्यात अशी वेळसुद्धा आली होती, जेव्हा त्याला शेळ्यांना चारा चारण्यासाठी घेऊन जावे लागत असे. अशा कठीण काळात तो लडाखमधून जम्मू काश्मीरसाठी क्रिकेट खेळणारा पहिला क्रिकेटपटू बनला.
३१ वर्षीय दोर्जेने लडाखमधील स्थानिक टुर्नामेंटमध्ये आपल्या खेळीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. या स्पर्धेत त्याला अनेकदा मालिकावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. तसेच त्याला फ्रीज, कुलर, वॉशिंग मशिन देऊन गौरविण्यात आले होते. स्थानिक टुर्नामेंटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर त्याने प्रथम श्रेणी क्रिकेट खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यासाठी त्याने प्रचंड मेहनत घेतली आणि जम्मू काश्मीर संघात पदार्पण केल्यानंतर परवेज रसूल याने त्याला पदार्पणाची कॅप दिली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
फेक फिल्डिंगने हुकवलं फखर जमानचं द्विशतक, पाकिस्तानी दिग्गजाने क्विंटन डीकॉकला सुनावली खरीखोटी
अरेरे! फक्त क्विंटन डीकॉक नव्हे तर ‘या’ यष्टीरक्षकानेही पाकिस्तानी फलंदाजाला काढले होते वेड्यात






