मागील वर्षी 2022मध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या जगभरातील खेळाडूंचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हणजेच आयसीसीने गौरव केला. त्यामध्ये पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याच्या नावाचाही समावेश आहे. आयसीसीने बाबरला वनडे क्रिकेटर ऑफ द इअर पुरस्काराने गौरवले आहे. विशेष म्हणजे, बाबरने सलग दुसऱ्या वर्षी हा किताब जिंकला आहे. त्याने आपल्या प्रदर्शनाने जगभरातील चाहते आणि दिग्गजांचे मन जिंकले आहे. मात्र, त्याच्यासाठी हा प्रवास सोपा नव्हता. त्याने आयुष्यात संघर्ष केला आहे. एक वेळ अशीही होती, जेव्हा त्याच्या घरात खाण्यासाठी अन्नाचा कणही नव्हता. अशात बाबर आझमच्या वडिलांनी संघर्षाच्या काळाबाबत भावूक वक्तव्य केले. त्यांचा व्हिडिओ व्हायरल होतोय.
बाबर आझम (Babar Azam) याच्या वडिलांनी सांगितले की, “फक्त एकाच व्यक्तीपुरते जेवण असायचे. जर मी खाल्ले असते, तर बाबरला उपाशी राहावे लागते.”
बाबर आझमच्या वडिलांचा व्हिडिओ व्हायरल
खरं तर, आयसीसी किताब जिंकल्यानंतर बाबर आझम आणि त्याच्या वडिलांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत बाबर आझमचे वडील (Babar Azam Father) त्यांच्या जुन्या दिवसांच्या आठवणींना उजाळा देत भावूक किस्सा सांगताना दिसत आहेत. या व्हिडिओत बाबरही त्याच्या जुन्या दिवसांबाबत बोलताना दिसत आहे. यावेळी त्याच्या डोळ्यातून अश्रूही झळकले.
This is what success looks like! Babar Azam ❤️pic.twitter.com/gcAeOU6iuc
— Farid Khan (@_FaridKhan) January 27, 2023
बाबरचे वडील म्हणाले की, “मला त्वचेची ऍलर्जी होती. माझा मुलगा मैदानात खेळायचा आणि मी बाहेर उन्हात असायचो हे यामागील कारण नव्हते. त्यावेळी एकाच व्यक्तीची भूक भागेल इतकेच पैसे असायचे. बाबर विचारायचा, पप्पा तुम्ही जेवलात का? मी म्हणायचो, हो मी जेवलो. आम्ही दोघेही एकमेकांना खोटं बोलायचो.”
बाबर आझमचे 2022मधील प्रदर्शन
बाबर आझम याच्या 2022मधील कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने एकूण 9 सामन्यात फलंदाजी करताना 84.87च्या सरासरीने 679 धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने 3 शतके आणि 5 अर्धशतके झळकावली. फक्त एकदा तो अपयशी ठरला होता. बाबरने कसोटी क्रिकेटमध्येही जबरदस्त कामगिरी केली. त्याने 9 सामन्यात एकूण 1184 धावा चोपल्या. आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये त्याने 26 सामन्यात 31.95च्या सरासरीने 735 धावा चोपल्या. त्यात 1 शतक आणि 5 अर्धशतकांचा समावेश होता. (skipper babar azam crying after father recall struggling old days video viral pakistani captain babar won icc cricketer award)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबईचं टेन्शन वाढलं! आर्चर तब्बल 678 दिवसांनी उतरला मैदानात, पण नावावर लाजीरवाण्या विक्रमाची नोंद
क्या बात है! मिताली पुन्हा ठेवणार मैदानावर पाऊल, महिला आयपीएलमध्ये मिळाली ‘या’ संघाची मोठी जबाबदारी






