गतविजेत्या गुजरात टायटन्स संघाने आयपीएल 2023च्या 35व्या सामन्यात 5 वेळचा चॅम्पियन मुंबई इंडियन्स संघाला 55 धावांनी धूळ चारली. मंगळवारी (दि. 25 एप्रिल) नरेंद्र मोदी स्टेडिअमवर पार पडलेल्या या सामन्यात मुंबईला लोळवताच गुजरात संघाने हंगामातील पाचवा विजय मिळवला. या विजयानंतर कर्णधार हार्दिक पंड्या याने मोठी प्रतिक्रिया दिली. त्याने यावेळी गोलंदाजी प्रशिक्षक आशिष नेहरा याचेही कौतुक केले.
दोन्ही विभागात चमकला गुजरात संघ
या सामन्यात गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 6 विकेट्स गमावत 207 धावा केल्या. या धावा करताना गुजरातकडून शुबमन गिल (56), डेविड मिलर (46), अभिनव मनोहर (42) आणि राहुल तेवतिया (20) यांनी तुफान फटकेबाजी केली. मुंबई जेव्हा 208 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरला, तेव्हा त्यांना 20 षटकात 9 विकेट्स गमावत 152 धावाच करता आल्या. त्यामुळे गुजरातने 55 धावांनी मोठा विजय मिळवला.
For his cracking 42 off just 21 deliveries in the first innings, Abhinav Manohar receives the Player of the Match award 👏🏻👏🏻 @gujarat_titans complete a 55-run win over #MI 👌🏻👌🏻
Scorecard ▶️ https://t.co/PXDi4zeBoD#TATAIPL | #GTvMI pic.twitter.com/UqvluOyFVS
— IndianPremierLeague (@IPL) April 25, 2023
मुंबईच्या डावात गोलंदाजी करताना गुजरातकडून नूर अहमद (3 विकेट्स), राशिद खान (2 विकेट्स) आणि मोहित शर्मा (2 विकेट्स) चांगले चमकले. त्यांच्याव्यतिरिक्त कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) यानेही कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याला 2 धावांवर झेलबाद करत तंबूत धाडले.
काय म्हणाला हार्दिक?
या विजयानंतर हार्दिक पंड्या याने भाष्य केले. तो म्हणाला की, “आमचे लक्ष्य हेच होते की, आम्ही परिस्थितीनुसार खेळत राहावे. नेतृत्व माझ्या डोक्यात सुरू असते, आम्ही यात यशस्वी होत आहोत. जे काही निर्णय घेतो, तो माझा आणि नेहरा भाईचा निर्णय असतो. आमचे डोके एकसारखे चालते.”
अभिनवचेही केले कौतुक
पुढे बोलताना हार्दिक म्हणाला की, “नूरकडून गोलंदाजी करवून घेण्याचा हाच निर्णय होता की, सूर्यकुमार, ग्रीन आणि डेविड हे फलंदाज वेगवान गोलंदाजांविरुद्ध चांगली फलंदाजी करतात. आता तुम्ही परिणाम पाहू शकता. अभिनव मनोहर यासाठी असे म्हणेल की, ही त्याची कठोर मेहनत आहे. मी मागील वर्षापासून पाहत आहे की, सपोर्ट स्टाफ प्रयत्न करतात की, ते दोन तास सराव करतील.”
Clutch player 💪 top knock⚡
Our skipper is full of praise for @Abhinavms36 💯#AavaDe | #TATAIPL 2023 pic.twitter.com/j8bfMfRbpf
— Gujarat Titans (@gujarat_titans) April 26, 2023
मुंबईविरुद्धच्या विजयानंतर हार्दिक पंड्याचा गुजरात संघ गुणतालिकेत 10 गुणांसह दुसऱ्या स्थानी विराजमान झाला आहे. गुजरातचा पुढील सामना 29 एप्रिल रोजी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळला जाणार आहे. (skipper hardik pandya On gujarat titans victory said something unique about his and ashish nehra thinking)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अर्जुन अन् शुबमनचा सामना होताच नेटकऱ्यांनी सारा तेंडुलकरचे मीम्स केले व्हायरल, तुम्हीही पाहाच
रहाणेच्या कसोटी कमबॅकवर आली सर्वात मोठी प्रतिक्रिया, माजी निवडकर्ता आनंदी; म्हणाला, ‘याचे श्रेय…’