बुधवारी (दि. १३ एप्रिल) आयपीएल २०२२च्या २३व्या सामन्यात मुंबई इंडियन्सला पंजाब किंग्सविरुद्ध १२ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. यामुळे पंजाबने तर हंगामातील आपला तिसरा सामना खिशात घातला. मात्र, दुसरीकडे मुंबईला सलग पाचवा सामना गमवावा लागला. यावेळी प्रथम फलंदाजी करताना पंजाबने मुंबईला १९९ धावांचे आव्हान दिले होते. या धावांमध्ये युवा फलंदाज जितेश शर्मानेही फलंदाजीतून मोलाचे योगदान दिले. पंजाबच्या डावादरम्यान जितेशने अखेरच्या षटकात विस्फोटक अंदाजात फलंदाजी केली आणि जयदेव उनाडकटच्या षटकात चांगली फटकेबाजी करत जास्त धावा चोपल्या.
मुंबईने या सामन्यात नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. यावेळी पहिल्यांदा फलंदाजी करताना पंजाब संघाने सुरुवातीपासूनच चांगल्या धावा चोपल्या होत्या. अखेरच्या षटकात जितेश शर्माने (Jitesh Sharma) मुंबईविरुद्ध १५ चेंडूंचा सामना करताना २००च्या स्ट्राईक रेटने ३० धावांची वादळी खेळी केली. या युवा यष्टीरक्षक फलंदाजाने आपल्या या खेळीत २ चौकार आणि २ षटकारही मारले. जितेशने उनाडकटच्या षटकात केलेली फटकेबाजी पाहून फक्त चाहतेच नाहीत, तर पंजाब किंग्सचे सर्व खेळाडूही चकित झाले. यादरम्यानचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
https://twitter.com/SlipDiving/status/1514279340363550726?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1514279340363550726%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.cricketnmore.com%2Fcricket-news%2Fwatch-mayank-agarwal-and-pbks-dugout-reaction-on-jitesh-sharma-explosive-innings-97654
ही घटना पंजाबच्या डावाच्या १८व्या षटकादरम्यानची आहे. मैदानावर शिखर धवन आणि जितेश शर्माची जोडी फलंदाजी करत होती. यावेळी संघाला मोठ्या फटकेबाजीची अपेक्षा होती. अशात जितेशने ही जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेतली आणि उनाडकटच्या गोलंदाजीवर पहिल्या ३ चेंडूत षटकार, चौकार आणि पुन्हा एकदा षटकार मारला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
उनाडकटच्या षटकातील ३ चेंडूंवर १६ धावा केल्यानंतरही जितेश शांत बसला नाही. त्याने याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर शानदार खेळ करत जबरदस्त चौकार मारला. जितेशने मारलेले फटके इतके जबरदस्त होते की, डगआऊटमध्ये बसलेले दिग्गज खेळाडू आणि कर्णधार मयंक अगरवाल (Mayank Agarwal) यांची रिऍक्शन पाहण्यासारखी होती. त्यामुळेच हा व्हिडिओ इतका जोरदार व्हायरल होत आहे.
या सामन्यात पंजाब किंग्सचा कर्णधार मयंक अगरवालने ५२ धावा केल्या. तसेच, फलंदाज शिखर धवननेही ७० धावांची अर्धशतकी खेळी केली होती.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
Video: जेव्हा मैदानावर तोंड पाडून बसला सूर्यकुमार, पोलार्डने असे काही करत जिंकली करोडो हृदये
चेंडू सीमापार करण्यात शिखर ‘नंबर वन’; विराट, गेल सारखे खेळाडू पडलेत मागे
रोहितवर बंदीची टांगती तलवार! मुंबई इंडियन्सची ‘ही’ एक चूक पडू शकते भलतीच महागात