वेस्ट इंडीज दौऱ्यावर असलेला भारतीय संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. मायदेशात खेळत असताना वेस्ट इंडीजला एकदिवसीय मालिकेतील पहिले दोन्ही सामने गमावण्याची वेळ आली आहे. वेस्ट इंडीजने या मालिकेत चांगले प्रदर्शन केले, पण अंतिम षटकांमध्ये भारतीय संघाने बाजी मारल्याचे दिसले आहे. याच पार्श्वभूमीवर वेस्ट इंडीजचा कर्णधार निकोलस पूरनने खास प्रतिक्रिया दिली आहे.
तसे पाहिले तर, वेस्ट इंडीजकडे एकदिवसीय मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवण्यासाठी चांगली संधी होती. परंतु पहिल्या सामन्यात त्यांचा संघ लक्ष्यापासून अवघ्या ३ धावांनी लांब राहिला आणि सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. उभय संघातील दुसऱ्या सामन्याचा विचार केला, तर भारतीय संघाने यावेळीही शेवटच्या षटकात विजय मिळवला. अष्टपैलू अक्षर पटेलने षटकार मारून संघाला विजय मिळवून दिला होता. वेस्ट इंडीज संघासाठी हा एकदिवसीय क्रिकेटमधील सगल आठवा पराभव असल्यामुळे संघासाठी हा पराभव खूपच वेदना देणारा होता. त्यांच्यासाठी या सामन्याचे महत्व कर्धणार निकोलस पूरन (Nicholas Pooran) याच्या प्रतिक्रियेत दिसून येते.
एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या सामन्यापूर्वी पूरन बोलत होता. तो म्हणाला की, “खेळाडूंच्या आत्मविश्वासावर काहीच फरक पडला नाहीये. परंतु त्यांना सामना गमावल्याचे दुःख आहे. असे असले तरी, तो एक वेगळा सामना आणि अनुभव होता, ज्यामध्ये आम्हाला खेळण्याची संधी मिळाली. या खेळात आम्हाला वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळात आहेत आणि मला आनंद आहे की, आम्हाला अनुभव येत आहे.”
“आम्ही नवनवीन पद्धतींनी पराभूत होत आहोत. परंतु खेळाडूंच्या आत्मविश्वासावर काहीच परिणाम होत नाहीये आणि ते पुन्हा एकदा सामन्यासाठी पूर्णपणे तयार आहेत. आम्ही तिसऱ्या सामन्यात आमच्या पूर्ण ताकतीने सामोरे जाऊ आणि विजय मिळवण्याचा प्रयत्न करू,” असेही पूरन पुढे बोलताना म्हणाला.
दरम्यान, उभय संघातील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना बुधवारी (२७ जुलै) त्रिनिदादमध्ये खेळला जाणार आहे. एकदिवसीय मालिकेनंतर भारताला वेस्ट इंडीजविरुद्ध पाच सामन्यांची टी-२० मालिका देखील खेळायची आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
आता सगळ्यांना तोंड फुटलंय! विराटवर टीका करणाऱ्यावंर सीएसकेचा खेळाडू भडकला
वेस्ट इंडीजविरुद्धची टी-२० सीरीजही नाही खेळणार केएल राहुल? रोहितसोबत ‘हे’ फलंदाज करतील ओपनिंग
फक्त क्षेत्ररक्षणासाठी मिळाला होता ‘मॅन ऑफ द मॅच’, सुवर्णाक्षरांनी लिहीले गेले नाव