या वर्षाच्या अखेरीस म्हणजेच ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान भारतात वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेचे आयोजन होणार आहे. या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात वनडे मालिका खेळली जाणार आहे. ही मालिका भारतासाठी खूपच महत्त्वाची असेल. कारण, 5 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या वनडे विश्वचषकापूर्वी भारतीय संघाचा सामना बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. खरं तर, भारत-ऑस्ट्रेलिया संघात 22 सप्टेंबरपासून तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेनंतर दोन्ही संघ विश्वचषकात खेळतील. मात्र, या मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलिया संघाच्या अडचणी वाढत असल्याचे दिसत आहे. कारण, संघाचा स्टार खेळाडू दुखापतग्रस्त झाला आहे.
भारताविरुद्धच्या मालिकेला मुकणार कमिन्स?
खरं तर, भारताविरुद्धच्या मालिकेतून पॅट कमिन्स (Pat Cummins) बाहेर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण, कमिन्स मनगटाच्या दुखापतीने ग्रस्त आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार कमिन्सला नुकत्याच संपलेल्या ऍशेस मालिकेत मनगटाची गंभीर दुखापत झाली होती. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने याबाबत अद्याप कोणतीही माहिती दिली नाहीये.
मात्र, ऑस्ट्रेलियन माध्यमांनी केलेल्या दाव्यानुसार, कमिन्स दुखापतीमुळे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघातील वनडे मालिकेला मुकणार आहे. मागील दोन महिन्यात 6 कसोटी सामने खेळणाऱ्या कमिन्सला आता विश्रांतीची गरज असल्याचे सांगितले जात आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया पुढील आठवड्यात भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी संघाची घोषणा करू शकतो.
Pat Cummins could miss the 3 match ODI series against India next month due to a wrist injury. pic.twitter.com/n1ApOg2rPg
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 5, 2023
ऑस्ट्रेलियाला मोठा धक्क
कमिन्स भारताविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर पडला, तर हा ऑस्ट्रेलिया संघासाठी मोठा धक्का असेल. कारण, या मालिकेनंतर काही दिवसातच वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) स्पर्धेला सुरुवात होईल. अशात जर संघ नियमित कर्णधाराशिवाय खेळला, तर त्यांच्यावर पराभवाचे संकट येऊ शकते. विश्वचषकात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघ 8 ऑक्टोबर रोजी एकमेकांशी भिडताना दिसणार आहेत. हा सामना चेन्नई येथे खेळला जाणार आहे.
वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा
पहिला सामना- 22 सप्टेंबर, शुक्रवार, मोहाली, दु- 1.30 वा
दुसरा सामना- 24 सप्टेंबर, रविवार, इंदोर, दु- 1.30 वा
तिसरा सामना- 27 सप्टेंबर, बुधवार, राजकोट, दु- 1.30 वा
टी20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा
पहिला सामना- 23 नोव्हेंबर, गुरुवार, वायझॅग, सायं. 7 वा
दुसरा सामना- 26 नोव्हेंबर, रविवार, त्रिवेंद्रम, सायं. 7 वा
तिसरा सामना- 28 नोव्हेंबर, मंगळवार, गुवाहाटी, सायं. 7 वा
चौथा सामना- 1 डिसेंबर, शुक्रवार, नागपूर, सायं. 7 वा
पाचवा सामना- 3 डिसेंबर, रविवार, हैदराबाद, सायं. 7 वा (skipper pat cummins could miss the 3 match odi series against india next month due to a wrist injury)
महत्त्वाच्या बातम्या-
विराट आणि रोहितमध्ये सर्वोत्तम कोण? विंडीजच्या स्टार खेळाडूने क्षणाचाही विलंब न करता सांगितले उत्तर
पीसीबीचा ऐतिहासिक निर्णय! पाकिस्तानी खेळाडूंचा पगार चार पटींनी वाढणार, ‘हे’ स्टार क्रिकेटर होणार मालामाल