---Advertisement---

World Cup 2023 Finalच्या पराभवानंतर रोहितचा पहिला Interview, वेदना लपवू शकला नाही कर्णधार; Video करेल भावूक

Rohit-Sharma
---Advertisement---

Rohit Sharma Interview: भारतीय संघ मागील महिन्यात 19 नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या विश्वचषक 2023 अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाला होता. या पराभवाला आता 20पेक्षा जास्त दिवस झाले आहेत, पण याच्या वेदना अजूनही चाहत्यांपासून ते खेळाडूंपर्यंत सर्वांच्या मनात आहेत. अशात रोहित शर्मा 23 दिवसांनंतर पहिल्यांदा कॅमेऱ्यापुढे आला आहे. रोहितने विश्वचषकानंतर पहिल्यांदा मुलाखत दिली आहे. यादरम्यान त्याच्या चेहऱ्यावरील भाव पाहून समजते की, कदाचित तो त्या वेदना लपवू शकत नाहीये. त्याचा हा व्हिडिओ मुंबई इंडियन्स संघाने शेअर केला आहे.

रोहित शर्माचे विधान
रोहित शर्मा (Rohit Sharma) म्हणाला की, “मला माहिती नव्हते की, यातून कशाप्रकारे बाहेर पडू. पहिल्या काही दिवसांमध्ये काय करावे हे मला माहिती नव्हते. माझे कुटुंब, मित्रांनी गोष्टी सोप्या केल्या आणि माझी साथ दिली. मात्र, गोष्टी विसरून पुढे जाणे सोपे नव्हते. हे खूपच दुर्दैवी असते. तुम्ही सर्वकाही चांगले केले, जे तुम्ही करू शकत होता. जर मला कुणी विचारले की, तू कुठे चुकला, तर माझ्याकडे उत्तर नसेल. आम्ही 10 सामने जिंकले, परिपूर्ण कुणीही नसते. तुम्ही विजयी होता, तेव्हाही चुका करता. मला संघाचा खूप अभिमान वाटतो.”

https://twitter.com/mipaltan/status/1734831464519528828?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1734831464519528828%7Ctwgr%5E8661f92de8e9dea823d86eb1f8e604ff7985e532%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news24online.com%2Fsports%2Fcricket%2Frohit-sharma-first-interview-after-world-cup-2023-loss-hitman-still-cannot-move-on-watch-video%2F488047%2F

‘लोकांनी राग नाही, प्रेम दिले’
पुढे बोलताना रोहित म्हणाला की, “अंतिम सामन्यानंतर माझ्यासाठी सोपे नव्हते की, त्यातून बाहेर कसे पडावे. मी दूर जाण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे यातून बाहेर पडू शकेल. मी जिथेही जात होतो, त्या आठवणी सोबत होत्या. मात्र, सर्वांचे आभार की, आम्हाला इतका पाठिंबा मिळाला. त्या सर्वांना खूप खूप धन्यवाद. मला त्यांच्यासाठीही वाईट वाटले, पण चांगली बाब अशी होती की, जेव्हा मी लोकांना भेटलो, तेव्हा त्यांनी मला समजून घेतले. त्यांच्यात राग नव्हता, पण जेव्हा मी त्यांना भेटलो, तेव्हा निखळ प्रेम दिसले. यामुळे मला ताकद मिळाली आणि मी पुढे जाऊ शकत आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Mumbai Indians (@mumbaiindians)

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर परतणार रोहित
रोहित शर्मा सध्या ब्रेकवर आहे. त्यानंतर तो दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. सर्वप्रथम तो भारतीय अ संघासाठी खेळताना दिसेल. त्यानंतर 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत तो कर्णधार म्हणून भारतीय संघात पुनरागमन करेल. या दौऱ्यात तो टी20 आणि वनडे संघाचा भाग नाहीये. अशात प्रश्न उपस्थित होत आहेत की, टी20 विश्वचषक 2024 स्पर्धेत रोहित भारतीय संघाचा भाग असेल की, नाही. असेही म्हटले जात आहे की, बोर्ड त्याला कर्णधार म्हणून पाहू इच्छित आहे, पण अद्याप याविषयी अंतिम निर्णय झाला नाहीये. याविषयी काय निर्णय लागतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (skipper rohit sharma first interview after world cup 2023 loss hitman still cannot move on see video)

हेही वाचा-
दु:खद! न्यूझीलंडचा दिग्गज हरपला, क्रिकेटविश्व शोकसागरात
पॅट कमिन्सबद्दल भारतीय दिग्गजाची मोठी भविष्यवाणी; म्हणाला, ‘आयपीएल लिलावात त्याच्यावर…’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---