रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स संघासाठी हा हंगाम बरा-वाईट ठरताना दिसत आहे. कारण, त्यांनी आतापर्यंत 7 सामने खेळले आहेत. त्यातील पहिल्या दोन सामन्यात पराभव पत्करल्यानंतर सलग तीन सामने नावावर केले होते. त्यानंतर पुन्हा दोन सामन्यात पराभवाचा धक्का सहन करावा लागला. मुंबईचा सातवा, तर स्पर्धेतील 35वा सामना मंगळवारी (दि. 25 एप्रिल) अहमदाबाद येथे पार पडला. या सामन्यात मुंबईला गतविजेत्या गुजरात टायटन्स संघाकडून 55 धावांनी पराभव मिळाला. या पराभवानंतर कर्णधार रोहित गोलंदाजांवर नाराज असल्याचे दिसले.
गुजरात टायटन्स वि. मुंबई इंडियन्स (Gujarat Titans vs Mumbai Indians) संघातील नाणेफेक रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वातील मुंबईने जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. हा सामना अहमबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रंगला होता. अशात गुजरात संघाने आपल्या घरच्या मैदानावर रोहितचा हा निर्णय चुकीचा सिद्ध केला आणि निर्धारित 20 षटकात 6 विकेट्स गमावत 207 धावांचा डोंगर उभा केला होता. हे आव्हान पार करताना रोहितसेनेच्या नाकी नऊ आल्या. यावेळी मुंबईला 20 षटकात 9 विकेट्स गमावत फक्त 152 धावाच करता आल्या.
काय म्हणाला रोहित?
या पराभवानंतर रोहित शर्मा म्हणाला की, “होय, वाईट वाटतं की, 15 षटकांपर्यंत आमच्या हातात सामना होता. मात्र, त्यानंतर आम्ही खराब गोलंदाजी केली. तुम्ही कोणत्या फलंदाजाला चेंडू टाकत आहात, हे पाहिलं पाहिजे. मात्र, आम्ही यात अपयशी ठरलो. प्रत्येक संघाची आपली वेगळी ताकद असते, आमची फलंदाजी चांगली आहे, त्यामुळे आम्ही आव्हानाचा पाठलाग करण्याचा विचार करत होतो.”
पुढे बोलताना रोहित म्हणाला की, “आम्ही सुरुवातीपासूनच फलंदाजीत संघर्ष केला. आम्ही बॅटमधून चांगली कामगिरी केली नाही. आम्हाला भागीदारीची आवश्यकता होता. शक्य तितक्या चांगल्या फलंदाजीची आवश्यकता होता.”
For his cracking 42 off just 21 deliveries in the first innings, Abhinav Manohar receives the Player of the Match award 👏🏻👏🏻 @gujarat_titans complete a 55-run win over #MI 👌🏻👌🏻
Scorecard ▶️ https://t.co/PXDi4zeBoD#TATAIPL | #GTvMI pic.twitter.com/UqvluOyFVS
— IndianPremierLeague (@IPL) April 25, 2023
या पराभवानंतर मुंबई इंडियन्स संघ गुणतालिकेत सातव्या स्थानी पोहोचला आहे. त्यांनी 7 सामन्यात फक्त 3 विजय मिळवले आहेत, तर 4 सामन्यांवर पाणी सोडावे लागले आहे. तसेच, गुजरात टायटन्स संघाने 10 गुणांसह दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. गुजरातने 7पैकी 5 सामने जिंकले आहेत. (skipper rohit sharma got angry on the bowlers after the defeat against Gujarat Titans)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
गुजरात टायटन्सने केला मुंबई इंडियन्सचा पाडाव! 55 धावांनी विजय मिळवत हार्दिक सेना दुसऱ्या क्रमांकावर
दुखापतग्रस्त पंतच्या फिटनेसची नवी अपडेट, वनडे विश्वचषकातून पत्ता कट!