जगभरातील दिग्गज खेळाडूंमध्ये भारताच्या अनेक खेळाडूंचा समावेश होतो. त्यातीलच एक नाव म्हणजे रोहित शर्मा होय. रोहितने त्याच्या शानदार कामगिरीच्या जोरावर तिन्ही क्रिकेट प्रकारातील भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेतली आहे. याव्यतिरिक्त तो जगातील सर्वात मोठी टी२० लीग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच सर्वांच्या आवडत्या आयपीएलमधील फ्रँचायझी मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधारही आहे. त्याने आपल्या नेतृत्वात संघाला एकदा-दोनदा नाही, तर तब्बल ५ वेळा आयपीएलचा किताब जिंकून दिला आहे. मात्र, हे झालं २०२२ आयपीएलपूर्वीचं. यंदाच्या १५व्या हंगामात मात्र रोहित आपल्या संघासह रुळावरून खाली घसरला.
रोहित शर्मा (Rohit Sharma) यंदाच्या आयपीएल (IPL 2022) हंगामात सपशेल फ्लॉप ठरलाय. ५ वेळा आयपीएलचा किताब जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघालाही या हंगामात गुणतालिकेत तळात राहावे लागले. मुंबईने खेळलेल्या १४ सामन्यांमध्ये फक्त ४ सामने जिंकण्यात मुंबईला यश आले. उर्वरित १० सामन्यावर त्यांना पाणी सोडावे लागले. तसेच, रोहितच्या प्रदर्शनाबद्दल बोलायचं झालं, तर त्याने १४ सामने खेळताना १९.१४च्या सरासरीने फक्त २६८ धावा चोपल्या. त्याच्या खराब फॉर्मचाही कुठेतरी संघाच्या कामगिरीवर परिणाम झाला.
आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच असे काही झाले की, रोहित कोणत्याही आयपीएल हंगामात एकही अर्धशतक झळकावू शकला नाही. या हंगामात रोहित खराब फॉर्ममधून का गेला? याची ५ कारणे आपण या लेखातून जाणून घेऊया.
रोहितच्या खराब फॉर्ममागील ५ कारणे
१. पायाच्या कमकुवत हालचालीमुळे रोहितच्या खेळावर झाला परिणाम
रोहितचा खेळ नेहमीच शानदार राहिला आहे. यासोबतच त्याची पायाची हालचालही त्याच्या फलंदाजीची खासियत असायची. आयपीएल २०२२मध्ये रोहितने पायाची हालचाल खूपच कमी राहिली. तो चेंडूपर्यंत जाण्याव्यतिरिक्त जाग्यावरूनच फटके मारण्याचा प्रयत्न करताना दिसला. याचा परिणाम असा झाला की, यामुळे त्याला आपली विकेट गमवावी लागली.
रोहितच्या लहानपणीचे प्रशिक्षक दिनेश लालदेखील ही गोष्ट मान्य करतात. ते सांगतात, फलंदाजीदरम्यान रोहितच्या पायाची हालचाल तितकी झाली नाही, जितकी हवी होती. मात्र, दिनेश हे रोहितच्या फॉर्मची अपेक्षा वर्तवतात.
२. यशाच्या पायऱ्या चढण्याचा दबाव दिसला रोहितच्या कामगिरीवर
आयपीएल इतिहासात एकटा रोहित सोडला, तर इतर कोणत्याही कर्णधाराला ५ वेळा आयपीएलचा किताब जिंकता आलेला नाहीये. इतके मोठे यश मिळवल्यानंतरही रोहितवर हा इतिहास पुन्हा रचण्याचा दबाव स्पष्टपणे दिसला. शेवटच्या हंगामात अपयशाचा सामना केल्यानंतर तो प्रत्येक सामन्यात काही तरी वेगळे करण्याचा प्रयत्न करताना दिसला. जर सलामीला फलंदाजी करताना त्याला समस्या होत होती, तर रोहितला मधल्या फळीत काही सामने खेळू शकला असता.
सुरुवातीच्या षटकांमध्ये वेगवान आणि स्विंगव्यतिरिक्त रोहित जर खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजाला मिळणारी मदत संपल्यानंतर फलंदाजीला उतरला असता, तर त्याला चांगली कामगिरी करता आली असती. एका मोठ्या खेळीने त्याचा आत्मविश्वास आणखी वाढवला असता, जो संघाच्या फलंदाजी फळीला मजबूत करण्यात फायदेशीर ठरला असता. हंगामात लवकर यश मिळवण्यासाठी रोहितने प्रत्येक प्रयत्न केला, पण तो अपयशी ठरला.
३. वेगवान गोलंदाजांसमोर टिकू शकला नाही रोहित
वेगवान गोलंदाजांसमोर यावेळी रोहितची बॅट तळपली नाही. तो १४ डावात ९ वेळा वेगवान गोलंदाजांचा शिकार बनला. रोहितने वेगवान गोलंदाजांविरुद्ध २१९ धावा केल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट १२१चा होता. जो रोहित पुल शॉटवर वेगवान गोलंदाजीसमोर फटके मारायचा, तो या हंगामात त्यांच्यासमोर फक्त १२ षटकार आणि २४ चौकार मारू शकला. वेगवान गोलंदाजीविरुद्ध फलंदाजी करण्याचा रोहितचा कमकुवतपणा संपूर्ण संघाला महागात पडला.
४. सतत क्रिकेट खेळत असलेला रोहित दिसला मानसिकरीत्या थकलेला
रोहित सतत क्रिकेट खेळत आहे. यामुळे मानसिक थकवाही त्याच्या खेळात दिसून आला. संघाच्या शेवटच्या साखळी सामन्यानंतर रोहितने मान्य केले की, “खूप गोष्टी ज्या मला करायच्या होत्या, त्या या हंगामात करू शकलो नाही.” रोहित म्हणतो, “मी माझ्या प्रदर्शनावर खूप निराश आहे. तरीही, माझ्यासोबत हे यापूर्वीही घडले आहे. मी मानसिक गोष्टींवर लक्ष ठेवत फॉर्ममध्ये येण्याचा प्रयत्न करेल. यासाठी जेव्हाही मोकळा वेळ मिळेल, मी माझ्या खेळात बदल करेल.”
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
५. इतर फलंदाजांच्या अपयशाने वाढवला रोहितवरील दबाव
जगातील अव्वल ४ मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील फलंदाजांमध्ये सामील असलेल्या रोहितच्या फलंदाजीवर मुंबईच्या मुख्य फलंदाजांच्या अपयशाचा दबाव दिसला. तरीही, ईशान किशन या हंगामात ४०० धावांचा आकडा पार करण्यात यशस्वी झाला. मात्र, सुरुवातीच्या ८ सामन्यांमध्ये मिळालेल्या पराभवादरम्यानही त्याची कामगिरी अपेक्षेपेक्षा कमीच होती. अशात रोहित मोकळेपणाने आपल्या डावाची योजना करू शकला नाही.
मुंबईची मधली फळी कायरन पोलार्डने निराशाजनक कामगिरी केल्यामुळे दबावात आली असे म्हणले जात आहे. जोपर्यंत मुंबई पूर्णपणे आयपीएलमधून बाहेर झाली नाही, तोपर्यंत पोलार्डला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली गेली. हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्या हे या हंगामात मुंबईचा भाग नसल्यामुळे मुंबई संघ सुरुवातीच्या सामन्यांमध्ये सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हनसाठी तरसताना दिसला.
आधी रोहित मोकळेपणाने फटकेबाजी करू शकत होता. मात्र, त्याला मधल्या फळीत पोलार्ड सामना संपवण्याचा विश्वास होता, पण ते शक्य झाले नाही. शेवटच्या ६ सामन्यात ४ विजयासह मुंबईने आपला बोऱ्या बिस्तरा गुंडाळला. मात्र, संघाला टिम डेविडच्या रूपात धडाकेबाज फिनिशर मिळाला.
आता पुढच्या हंगामात मुंबई काय कमाल दाखवते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
चार वर्षात आयपीएलचे विजेते बदलले, पण पंजाबने आपली जागा नाही सोडली; पाहा काय केलाय पराक्रम