शनिवारी (२१ मे) मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सला पराभूत केल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ प्लेऑफमध्ये पोहोचला. दिल्ली कॅपिटल्सने जर हा सामना जिंकला असता, तर आरसीबी प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर निघाला असता, पण मुंबईने विजय मिळवल्यानंतर प्लेऑफमधील त्यांचे स्थान पक्के झाले. सामना सुरू असताना आरसीबीचे चाहते मैदानात त्यांच्या संघासाठी घोषणाबाजी करताना दिसले. त्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मुंबई आणि दिल्ली संघातील हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. सामना जिंकून मुंबई इंडियन्सने आरसीबीला प्लेऑफमध्ये स्थान मिळवून दिले. आरसीबीसाठी मुंबईचा विजय महत्वाचा होता आणि चाहत्यांनी ही गोष्ट चांगलीच मनावर घेतली होती. मुंबई आणि दिल्ली सामन्यादरम्यान आरसीबीचे चाहते मोठ्या प्रमाणात मैदानात उपस्थित होते. या चाहत्यांनी सामना सुरू असताना “आरसीबी-आरसीबी” अशा घोषणा दिल्या. सोशल मीडियावर आरसीबीच्या चाहत्यांची ही घोषणाबाची चांगलीच व्हायरल झाली आहे.
Mumbai Turns Benguluru #MIvsDC @RCBTweets pic.twitter.com/cq7Vq7y0Ga
— Lokesh PK VK???? (@comrade154) May 21, 2022
दरम्यान, सामन्याचा विचार केला, तर मुंबईने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने मर्यादित २० षटकांमध्ये ७ विकेट्सच्या नुकसानावर १५९ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईने हे लक्ष्य ५ विकेट्सच्या नुकसानावर आणि १९.१ षटकात गाठले.
सामन्यात मुंबईसाठी जसप्रीत बुमराह आणि टिम डेविड या दोघांनी जबरदस्त प्रदर्शन केले. दोघांच्या प्रदर्शनामुळे मुंबईचा विजय सोपा बनला. बुमराहने टाकलेल्या ४ षटकांमध्ये २५ धावा खर्च केल्या आणि तीन महत्वाच्या विकेट्स घेतल्या, तर टिम डेविडने जेव्हा संघाला धावांची गरज होती, तेव्हा अवघ्या ११ चेंडूत ३४ धावांचे योगदान दिले. यामध्ये त्याच्या २ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता.
रमणदीप सिंगने देखील दोन महत्वाच्या विकेट्स घेतल्या, पण अवघ्या दोन षटकांमध्ये त्याने २९ धावा खर्च केल्या. मुंबईचा सलामीवीर इशान किशनने ४८ धावा केल्या, पण रोहित शर्मा पुन्हा एकदा अपयशी ठरला. अवघ्या २ धावा करून रोहितने विकेट गमावली.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘त्यांच्यामुळे रिव्ह्यू नाही घेतला’, डेविडला मिळालेल्या जीवनदानावर रिषभ पंतचे स्पष्टीकरण