पुणे। ओम दळवी मेमोरियल ट्रस्ट यांच्या तर्फे आयोजित मित्तल ब्रदर्स व हेड इक्विपमेंट प्रायोजित व एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या ओम दळवी मेमोरियल वन प्लस करंडक चॅम्पियनशीप सिरीज 12 वर्षांखालील राष्ट्रीय मानांकन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटात युगंधर शास्त्री, आरव मुळ्ये, अंशुल पुजारी, रतन कुबसाद या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून मुख्य फेरीत प्रवेश केला.
महाराष्ट्र पोलीस जिमखाना, औंध येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात अंतिम पात्रता फेरीत अव्वल मानांकित युगंधर शास्त्रीने वेदांत जोशीचा 6-4, 7-5 असा तर, दहाव्या मानांकित आरव मुळ्ये याने पाचव्या मानांकित नमन शहाचा 6-0, 6-1 असा पराभव करून मुख्य फेरी गाठली. रतन कुबसाद याने तेराव्या मानांकित पुरंजय कुतवळचा 6-3, 6-0 असा पराभव केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम पात्रता फेरी: मुले:
युगंधर शास्त्री[1] वि.वि.वेदांत जोशी[12] 6-4, 7-5;
अंशुल पुजारी[2] वि.वि.आश्रित माज्जी[16] 6-1, 4-6, 6-4;
सय्यम पाटील[3]वि.वि.प्रजित मादीरेड्डी[9] 6-3, 6-3;
नीरज जोर्वेकर[4] वि.वि.अंश रामाणी 6-1, 6-1;
आरव मुळ्ये[10] वि.वि.नमन शहा[5] 6-0, 6-1;
रतन कुबसाद वि.वि.पुरंजय कुतवळ[13] 6-3, 6-0;
रुद्र मेमाने वि.वि.आदिनाथ कचरे 1-6, 6-1, 6-2;
तनिश पाटील[8] वि.वि.विवान मल्होत्रा 6-4, 6-1.
महत्त्वाच्या बातम्या –
रिषभ पंतची चूक नडली? ‘तो’ निर्णय घेतला असता, तर कदाचीत दिल्ली प्लेऑफ खेळली असती
प्लेऑफमध्ये का पोहोचू शकली नाही दिल्ली? पाहा कर्णधार पंतने काय सांगितलंय कारण
दिल्ली प्लेऑफमधून बाहेर होताच, मुंबईचा चारवर्षांपूर्वीचा हिशोब चूकता, वाचा नक्की काय झालेलं