वनडे विश्वचषक 2023 स्पर्धा तोंडावर आली आहे. अशात स्पर्धेपूर्वी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली असून त्यात रविचंद्रन अश्विन या दिग्गज फिरकीपटूला ताफ्यात सामील करण्यात आले आहे. आता कर्णधार रोहित शर्मा याने अश्विनला वनडे संघात जागा का दिली? याचे स्पष्टीकरण भारतीय संघाच्या माजी यष्टीरक्षकाने दिले आहे. चला तर जाणून घेऊयात…
भारतीय संघाचे माजी यष्टीरक्षक फलंदाज सबा करीम (Saba Karim) यांनी दावा केला आहे की, आर अश्विन (R Ashwin) याच्यातील सामना जिंकून देण्याची क्षमता आणि आक्रमक मानसिकतेमुळे त्याला संघात निवडले आहे.
काय म्हणाले करीम?
जिओ सिनेमावर अश्विनच्या पुनरागमनाविषयी बोलताना करीम म्हणाले, “मला वाटते की, रोहित शर्मा रविचंद्रन अश्विन याच्याकडे सामना विजेत्याच्या रूपात पाहतो. तो मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये ज्याप्रकारचा दृष्टिकोन दाखवू इच्छितो, त्याबाबत तो स्पष्ट आहे. आता विश्वचषक जवळ येण्यासोबतच त्याला वनडे क्रिकेटच्या गतीशीलतेबद्दल चांगली माहिती आहे. तो जाणतो की, त्याला अशा खेळाडूंना निवडावे लागेल, ज्यांची त्याप्रकारची आक्रमक मानसिकता असेल.”
करीम यांनी पुढे दावा केला की, “त्याला हेदेखील माहिती आहे की, त्याच्या गोलंदाजी लाईनअपमध्ये, त्याला सहापैकी कमीत कमी 5 विकेट्स घेण्याचे पर्याय ठेवावे लागतील. त्याच्याकडे 11 खेळाडूंमध्ये अश्विन असेल, तर तो आक्रमक पर्याय आहे. जर तुम्ही इतर राखीव खेळाडूंना पाहिलं, तर त्यामध्ये सर्वांची मानसिकता आक्रमक आहे. त्यासाठी मला वाटते की, रोहित तो आक्रमक दृष्टिकोन कायम ठेवू इच्छितो, जो आपण आशिया चषकात भारतीय संघाला खेळताना पाहिला होता.”
मालिकेला कधी होणार सुरुवात?
या मालिकेला 22 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. तसेच, मालिकेतील दुसरा सामना 24 आणि तिसरा सामना 27 ऑक्टोबर रोजी खेळला जाईल. या मालिकेनंतर भारतीय संघ इंग्लंड (30 सप्टेंबर) आणि नेदरलँड्स (3 ऑक्टोबर) संघांविरुद्ध विश्वचषकाचे सराव सामने खेळेल. त्यानंतर 8 ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याने विश्वचषक 2023 स्पर्धेच्या अभियानाची सुरुवात करेल. (skipper rohit sharma looks at ravichandran ashwin as a match winner says this former cricketer)
हेही वाचाच-
मोठी बातमी! भारतीय संघाच्या हुकमी एक्क्याला चढावी लागली कोर्टाची पायरी, काय लागला निकाल? लगेच वाचा
धक्कादायक! 3 भारतीयांचा समावेश असलेल्या मॅच फिक्सिंग रॅकेटचं भांडं फुटलं, आयसीसीची मोठी कारवाई