भारतीय संघाने बांगलादेश दौऱ्यात 3 सामन्यांची वनडे मालिका 1-2ने गमावली. मात्र, या मालिकेतील तिसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज ईशान किशन चमकला. विशेष म्हणजे, कर्णधार रोहित शर्मा यादरम्यान दुखापतग्रस्त झाल्यामुळे बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात ईशान किशनला खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने थेट इतिहास रचला. त्याने द्विशतक ठोकत खास विक्रम आपल्या नावावर केला. यानंतर रोहितने ईशानच्या खेळीसाठी त्याला शुभेच्छा दिल्या.
रोहित शर्माची इंस्टाग्राम पोस्ट
ईशान किशन (Ishan Kishan) याच्या द्विशतकावर चाहत्यांपासून ते दिग्गज खेळाडूंपर्यंत सर्वांनी प्रतिक्रिया दिल्या. यामध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) याचाही समावेश झाला. रोहितने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून ईशानचा जल्लोष करतानाचा फोटो शेअर केला आहेत. तसेच, त्याने त्यासोबत ईशानला टॅग करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “या क्लबची मजाच काही और आहे.” रोहितच्या या पोस्टवर कमेंट करत ईशानही म्हणाला की, “मजाच मजा आहे.”
https://www.instagram.com/p/CmA7DnUIpAF/
रोहित शर्माच्या या पोस्टला अवघ्या 6 तासात 13 लाखांहून अधिक लाईक्सचा वर्षाव झाला आहे. तसेच, 7 हजारांहून अधिक कमेंट्सचा वर्षाव झाला आहे.
ईशान किशनचा विक्रम
ईशान किशन याने बांगलादेशविरुद्ध 126 चेंडूत आपले द्विशतक साजरे केले होते. त्याने तिसऱ्या वनडे सामन्यात 131 चेंडूंचा सामना करताना 210 धावा कुटल्या. यामध्ये 10 षटकारांचा आणि 24 चौकारांचा समावेश होता. यासह ईशान सर्वात जलद द्विशतक ठोकण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. तो द्विशतक ठोकणारा जगातील सातवा आणि भारताचा चौथा खेळाडू आहे. त्याच्यापूर्वी 200 धावांच्या या क्लबमध्ये भारताच्या सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि रोहित शर्मा यांचाही समावेश आहे.
रोहितच्या नावावर तीन द्विशतकांचा विक्रम
रोहित शर्माने वनडे क्रिकेटमध्ये तीन द्विशतक झळकावले आहेत. त्याने श्रीलंकेविरुद्ध 264 धावांची खेळी केली होती. ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणत्याही फलंदाजाने केलेली सर्वोच्च खेळी आहे. याव्यितिरिक्त त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 209 आणि श्रीलंकेविरुद्ध 208 धावाही चोपल्या आहेत.
खरं तर, ईशान आणि रोहित हे आयपीएलमध्ये एकाच फ्रँचायझी संघाकडून खेळतात. दोघेही मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहेत. त्यांनी अनेकदा एकत्र फलंदाजी केली आहे. (skipper rohit sharma reacts on ishan kishan fastest double century)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सलाम तुझ्या समर्पणाला! 3 दिवसांपूर्वी पडले होते 4 दात, आता पुनरागमन करत संघाला बनवले विजयी
वाढलेल्या पोटामुळे लाईव्ह सामन्यात पंचांवर मान खाली घालण्याची वेळ, बाबर आझमने काय केले पाहाच