इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील दुसरा कसोटी सामना मुल्तानमध्ये खेळला जात आहे. मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने 74 धावांनी जिंकला. दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानला विजयासाठी शेवटच्या डावात 355 धावांचे लक्ष्य मिळाले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने 5 विकेट्सच्या नुकसानावर 202 धावा केल्या होत्या. यादरम्यान पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने मैदानात केलेले एक कृत्य चांगलेच व्हायरल होत आहे.
कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी अबरार अहमद (Abrar Ahmed) याने सर्वांच लक्ष वेधले. पहिल्या डावात अबरार अहमदने सर्वाधिक 7 विकेट्स घेतल्या. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) यानेही सर्वांचे लक्ष वेधले. बाबरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो पंचांची मजा घेताना दिसत आहे. बाबरने मैदानात उपस्थित पंच मराइस इरास्मस () यांच्या पोटाची थट्टा करताना दिसला. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे.
https://twitter.com/TheRealPCB/status/1601515925748219907?s=20&t=QU_oXtkdRlH4Z_fcpQWsgw
दरम्यान, दुसऱ्या दिवशी इंग्लंडच्या डावातील सहाव्या षटकातनंतर इमाम उल हक याचा एक थ्रो पंच मराइस इरास्मसच्या पोटावर लागला. हा प्रसंग पाहून सर्व खेळाडू हसू लागले. हे षटक संपल्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम पंचांच्या शेजारी जाऊन उभा राहिला आणि त्यांच्याप्रमाणे पोट बाहेर काढून उभा राहण्याचा प्रयत्न देखील करताना दिसला. हा प्रसंग पाहून मैदानात उपस्थित सर्वजण हसू लागले आणि स्वतः मराइस इरास्मस देखील हसताना दिसले. बाबारने जाताना पंचांच्या पोटावर फटका देखील मारला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
https://twitter.com/meet2faraz786/status/1601576991018606593?s=20&t=z_Qy1MhHtiHeOqY5gUYXGQ
व्हिडओसोबतच बाबर आणि पंचांमधील या प्रसंगादरम्यानचा एक फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत बाबरच्या मागच्या बाजूला पंच उभे आहेत. पण फोटोत असे वाटत आहे की, बाबरलाच पोट सुटले आहे. याविषयी चाहत्यांच्या वेगवेगळ्या आणि मजेशीर प्रतिक्रिया सध्या पाहायला मिळत आहेत. (Babar Azam mocked the umpires in a live match due to his enlarged stomach)
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
उनादकतच्या पुनरागमनानंतर पाच वर्षापासून बाहेर असलेला फलंदाज मागतोय संधी; ट्विट करत लिहिले, ‘प्रिय क्रिकेट…’
ऑस्ट्रेलियाने उडवली वेस्ट इंडिजची दाणादाण! 419 धावांनी मिळवला संस्मरणीय विजय





