भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आमने-सामने आहेत. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. असे असले, तरीही रोहित शर्मा जेव्हा नाणेफेकीसाठी जात होता, तेव्हा त्याच्यासोबत एक मोठी घटना घडता घडता राहिली. त्याचा यादरम्यानचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनीही जोरदार प्रतिक्रियांचा पाऊस पाडत रोहितला ट्रोल केले आहे.
व्हायरल होतोय व्हिडिओ
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत दिसते की, भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) नाणेफेकीपूर्वी मैदानाच्या दिशेने येत आहे. यावेळी पायऱ्यांवरून उतरत असतानाच पाय अडकला आणि तो अडखळला. यावेळी रोहित शर्मा पडता पडता वाचला. यावेळी त्याने स्वत:ला कसेबसे सावरले. मात्र, आता त्याचा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असून नेटकरी त्याला ट्रोल करत आहेत. काहीजण त्याला ट्रॉफीवरूनही ट्रोल करत आहेत.
काय म्हणाले नेटकरी?
एकाने रोहितला ट्रोल करत ट्वीट केले की, “एक व्यक्ती जो स्वत:ला सांभाळू शकत नाही, तो भारतीय संघाला सांभाळत आहे.”
A guy who can’t even handle himself is handling Team India ????????
— Aarav (@sigma__male_) June 7, 2023
दुसऱ्या एकाने ट्वीट करत लिहिले की, “आता कूल दिसण्याच्या नादात तोंडघशी पडला असता.”
abhi cool lagne ke chakkar me muh lagta neeche
— Khush (@perrypaunaa) June 7, 2023
आणखी एकाने लिहिले की, “ट्रॉफीदेखील अशीच पडणार आहे वाटतं.”
Trophy bhi ese hi girne wali hai lagta hai
— Rohit Singh (@imrohit45singh) June 7, 2023
आणखी एकाने असे ट्वीट केले की, “पोस्टर पाहूनच हादरला रोहित, बरं झालं पडला नाही, अन्यथा पुन्हा दुखापत झाली असती.”
poster dekh ke hil gaye rohit accha hua gire nahi warna phirse injury
— HelloWorld (@ShivamK83596389) June 7, 2023
जेवणाच्या ब्रेकपर्यंत ऑस्ट्रेलियाचा डाव
या सामन्यात जेवणाच्या ब्रेकपर्यंत ऑस्ट्रेलिया संघाने 23 षटकांनंतर 73 धावा चोपल्या होत्या. या धावा करताना त्यांनी 2 महत्त्वाच्या विकेट्सही गमावल्या होत्या. त्यात डेविड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा यांच्या विकेट्स होत्या. यावेळी वॉर्नरने 60 चेंडूत 43 धावा केल्या होत्या, तर ख्वाजा डावातील मोहम्मद सिराज याच्या चौथ्या षटकातील चौथ्याच चेंडूवर केएस भरत याच्या हातून झेलबाद झाला. यावेळी त्याला खातेही उघडता आले नाही. (skipper rohit sharma survived himself an injury scare before toss video viral)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सर्वात महत्त्वाच्या सामन्यातून अश्विनची हाकालपट्टी, अनुभवी गोलंदाजाविषयी काय म्हणाला रोहित? लगेच वाचा
भारीच! रोहित बनला ‘अशी’ कामगिरी करणारा भारताचा पाचवा कर्णधार, सर्वात भारी रेकॉर्ड ‘कॅप्टन कूल’ धोनीचा