Suryakumar Yadav Statement: भारतीय संघाला दक्षिण आफ्रिका दौऱ्यात टी20 मालिकेतील पहिला पराभव पत्करावा लागला. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे नाणेफेकीशिवाय रद्द झाला होता. त्यानंतर मंगळवारी (दि. 12 डिसेंबर) मालिकेतील दुसरा सामना सेंट जॉर्ज पार्क, केबेरहा येथे पार पडला. या सामन्यातही पावसाने एन्ट्री केली. त्यामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार दक्षिण आफ्रिकेने हा सामना 5 विकेट्स राखून नावावर केला. तसेच, मालिकेत 1-0ने आघाडी घेतली.
सूर्यकुमार यादवचे विधान
मालिकेत 1-0ने मागे पडल्यानंतर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने मोठे विधान केले. सामन्यानंतर बोलताना त्याने म्हटले की, “विरोधी संघाने सुरुवातीच्या 5-6 षटकात चांगली फलंदाजी केली आणि सामना आमच्यापासून दूर नेला. आमच्या खेळण्याची हीच पद्धत आहे. ब्रँड ऑफ क्रिकेट हाच आहे की, आम्ही मैदानात जाऊन मनमोकळेपणाने खेळावे. सामन्यादरम्यान ओल्या चेंडूने गोलंदाजी करण्यातही समस्या येत होती.”
मात्र, सूर्याला वाटते की, दौऱ्यातील आगामी सामन्यातही दवाची समस्या कायम राहील. तो म्हणाला, “भविष्यातही ही समस्या उद्भवू शकते. त्यामुळे हा सामना शिकण्याच्या दृष्टिकोनाने आमच्यासाठी खूपच चांगला राहिला. आता तिसऱ्या टी20 सामन्यासाठी उत्सुक आहोत.”
भारताचा पराभव
केबेरहाच्या सेंट जॉर्ज पार्क (St George’s Park Gqeberha) येथे पार पडलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. तसेच, भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यावेळी भारताने प्रथम फलंदाजी करताना 19.3 षटकात 7 विकेट्स गमावत 180 धावा केल्या होत्या. भारताकडून दोघांनी अर्धशतक केले. त्यात रिंकू सिंग (नाबाद 68) आणि कर्णधार सूर्यकुमार यादव (56) यांचा समावेश होता.
पहिल्या डावातील 3 चेंडू बाकी असतानाच पावसाने एन्ट्री केली. पाऊस थांबल्यानंतर डकवर्थ लुईस नियमानुसार यजमान संघाला विजयासाठी 15 षटकात 152 धावांचे नवे आव्हान देण्यात आले. हे आव्हान त्यांनी 13.5 षटकात 5 विकेट्स गमावत पूर्ण केले. दक्षिण आफ्रिकेकडून सामन्यात तबरेज शम्सी याने चांगली गोलंदाजी केली. त्याने 3.3 षटकात 32 धावा खर्चत 3 विकेट्स घेतल्या. यासाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. (skipper suryakumar yadav india vs south africa 2nd t20i match 2023 ind vs sa georges park gqeberha)
हेही वाचा-
T20i Series । दक्षिण आफ्रिका 14व्या षटकात विजयी, 5 विकेट्सने राखून भारताला चारली पराभवाची धूळ
सूर्या-रिंकूच्या अर्धशतकांमुळे भारत अडचणीतून बाहेर! सामना जिंकण्यासाठी दक्षिण आफ्रिकेकडे फक्त 15 षटके