सध्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील अखेरचा सामना बुधवारी (दि. 22 मार्च) चेन्नई येथे खेळला जाणार आहे. याव्यतिरिक्त दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज संघातही 3 सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. यामधील अखेरचा सामना सेनवेस पार्क येथे खेळला जात आहे. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता, तर दुसरा सामना वेस्ट इंडिजने जिंकला होता. अशात तिसऱ्या सामन्यापूर्वीच दक्षिण आफ्रिका संघाला मोठा धक्का बसला.
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमा (Temba Bavuma) हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे तिसऱ्या वनडेतून बाहेर पडला आहे. त्यामुळे बावुमाची अनुपस्थिती आफ्रिकेसाठी चिंतेची बाब ठरू शकते. अशात बावुमाच्या अनुपस्थितीत संघाची धुरा जबरदस्त खेळाडूकडे सोपवण्यात आली आहे. तो खेळाडू इतर कुणी नसून एडेन मार्करम (Aiden Markram) हा आहे. मार्करम तिसऱ्या वनडेत दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व करत तिसरा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल.
https://twitter.com/ProteasMenCSA/status/1638080943989596162
टेंबा बावुमा बाहेर, मार्करम कर्णधार
दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज (South Africa vs West Indies) संघातील वनडे मालिकेतील अखेरचा सामना खेळला जात. या सामन्यातून बावुमा बाहेर पडल्यामुळे आता त्याच्या जागी आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाचे नेतृत्व करणाऱ्या मार्करमला दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार म्हणून नेमले आहे.
मार्करमची कर्णधार म्हणून कामगिरी
मार्करम याने संघाचे नेतृत्व करण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. त्याने यापूर्वी 2018मध्ये दक्षिण आफ्रिका संघाचे नेतृत्व केले होते. भारतीय संघाने 3 कसोटी, 6 वनडे आणि 3 टी20 सामन्यांसाठी दक्षिण आफ्रिका दौरा केला होता. यामध्ये वनडे मालिकेतील पहिला सामना वगळता उर्वरित पाच सामन्यात दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व मार्करमकडे होते. मात्र, त्याला फक्त चौथ्याच वनडेत विजय मिळवता आला होता. भारताने वनडे मालिका 5-1ने खिशात घातली होती. आता पुन्हा एकदा संघाचे कर्णधारपद मार्करमकडे आले आहे. अशात तो कशी कामगिरी करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (skipper temba bavuma out from 3rd odi against wi aiden markram will lead south africa)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएलमध्ये सॅमसन पुन्हा करणार तोडफोड! व्हिडिओ पाहून विरोधकांना फुटला घाम
ब्रेट लीने सांगितले टीम इंडियाचे भविष्य, डब्ल्यूटीसी फायनल आणि वनडे विश्वचषक कोण जिंकणारा वाचाच





