भारतीय संघ सध्या दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर (india tour of south africa) आहे. दक्षिण अफ्रिका आणि भारत यांच्यातील कसोटी मालिकेचा तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना ११ जानेवारीपासून केपटाऊनमध्ये खेळला जाणार आहे. भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली (virat kohli) तिसऱ्या सामन्यात पुनरागमन करणार आहे. विराटने तिसरा सामना सुरू होण्यापूर्वी सोमवारी (१० जानेवारी) पत्रकार परिषद घेतली आणि यामध्ये अनेक गोष्टींवर बोलला. यावेळी तो रिषभ पंत (rishabh pant) याच्या खराब प्रदर्शनावर देखील बोलला.
कर्णधार विराट कोहली दक्षिण अफ्रिकेविरुद्ध जोहान्सबर्गमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळला नव्हता. पाठीच्या वेदनेमुळे त्याने दुसऱ्या कसोटीतून माघार घेतली होती. अशात तो तिसऱ्या कसोटीत खेळणार की नाही? याविषयी चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. सोमवारी पत्रकार परिषदेत विराटने चाहत्यांच्या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. पत्रकार परिषदेत बोलताना विराटने सुरूवातीलाच, ‘मी पूर्णतः फीट असून मैदानावर खेळण्यास सक्षम आहे.’ असे सांगितले.
दुसऱ्या सामन्यातील रिषभ पंतच्या बेजबाबदार खेळीवर विराटने एका वाक्यात दिले उत्तर
जोहान्सबर्ग कसोटी सामन्यात भारताचा दारूण पराभव झाला. याची कारणीमिमांसा करताना अनेकांनी रिषभ पंतला जबाबदार धरले. त्यांनीही त्याच्या चुकीच्या फटकेबाजीवर आणि बेफिकीर वागण्यावर बोट ठेवले. पत्रकार परिषदेत याच मुद्द्यावर बोलताना विराटने स्वतःचे मत मांडले. “आपल्या संपूर्ण करिअरमध्ये आपण सर्वजण कधीतरी चुका करत असतोच.” असे विराटने म्हटले. दरम्यान, पंतने दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण अफ्रिकेच्या खेळाडूसोबत वाद घातला होता. यादरम्यान मोठा फटका खेळण्याच्या नादात स्वतःची विकेट गमावली होती. यानंतर पंतवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली.
केपटाऊनमधील कसोटी सामना भारत आणि दक्षिण अफ्रिका दोन्ही संघांसाठी महत्वाचा असणार आहे. मालिकेती पहिल्या सामन्यात भारताने ११३ धावांनी विजय मिळवला होता. तर, दुसऱ्या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने सात विकेट्स राखून भारताला धूळ चारली होती. अशात मालिका १-१ अशा बरोबरीवर आहे. तिसऱ्या सामन्यात जो संघ विजय मिळवेल, तो मालिकाही जिंकणार आहे. भारताने आतापर्यंत दक्षिण अफ्रिकेत एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही, तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून संघ इतिहास घडवू शकतो.
महत्वाच्या बातम्या –
दोन वेळेस विश्वचषक उंचावला, पण मानाच्या रणजी ट्रॉफीत विजयापासून वंचित राहिलेले २ भारतीय शिलेदार
सर्वाधिक विकेट्स घेऊनही संघाने केले दुर्लक्ष, खुद्द गोलंदाजाने सांगितले आरसीबीच्या निर्णयामागचे कारण
व्हिडिओ पाहा –