कोलंबो | काल यजमान श्रीलंका संघावर रोमहर्षक विजय मिळवत बांगलादेशने अंतिम सामन्यात प्रवेश केला.उद्या भारत विरूद्ध बांगलादेश असा सामना होणार आहे.
परंतू श्रीलंका क्रिकेट बोर्डाने भारत विरूद्ध श्रीलंका असाच अंतिम सामना होईल हे गृहीत धरून सामन्याची तिकीटं प्रिंट केल्याचे समोर आले आहे.
श्रीलंकेतील एका क्रिकेट चाहत्याने याचा फोटोच फेसबुकवर शेअर केला आहे. ही तिकीटं प्रेसिडेंट बाॅक्समध्ये बसणाऱ्या चाहत्यांसाठीच्या कार पार्किंगची आहेत.
हा अंतिम सामना उद्या अर्थात 18 मार्च रोजी होणार आहे.
सिहंली भाषेत ‘निदहास ‘ या शब्दाचा अर्थ स्वातंत्र असा आहे. यावर्षी श्रीलंकेच्या स्वातंत्र्याला 70 वर्षे पूर्ण झाल्यामुळे ही मालिका होत आहे.
परंतू यजमान संघालाच अंतिम फेरीपुर्वी बाहेर पडण्याची नामुष्की आली आहे.
https://www.facebook.com/photo.php?fbid=10160163777475613&set=a.312538425612.335581.861960612&type=3&theater