श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया (SLvsAUS) यांच्यात गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियम, कोलंबो येथे दुसरा कसोटी सामना सुरू आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद ३६४ धावा केल्या होत्या. त्याच्या बदल्यात यजमान संघाच्या चार फलंदाजांनी अर्धशतके झळकावली आहेत. श्रीलंकेने ४ विकेट्स गमावत ३४४ धावा केल्या आहेत. तर तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू आहे.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ (Steve Smith) आणि मार्नस लॅब्युशेन (Marnus Labuschagne) यांनी शतकी खेळी केल्याने ऑस्ट्रेलिया ३००च्या पार गेला. बाकी फलंदाज श्रीलंकेच्या गोलंदाजीपुढे निभाव धरू शकले नाही. यावेळी पदार्पणाच्या सामन्यातच प्रबत जयसुर्या (Prabath Jayasuriya) याने सहा विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. त्याने ३६ षटकात ११८ धावा दिल्या आहेत.
प्रबतची आंतरराष्ट्रीय पदार्पणाची विकेट्स लॅब्यूशेनची ठरली आहे. नंतर त्याने ट्रेविस हेड, कॅमेरून ग्रीन, ऍलेक्स कॅरी, स्टार्क, नॅथन लायन यांना बाद केले आहे. आधी श्रीलंकेच्या गोलंदाजांनी त्रास दिला असून आता फलंदाजांची मोठी धावसंख्या रचण्याकडे वाटचाल सुरू आहे.
श्रीलंकेच्या पहिल्या डावाची सुरूवात अडखळत झाली आहे. सलामीवीर पथुम निसांका (Pathum Nissanka) हा स्वस्तातच बाद झाला. त्याला मिशेल स्टार्क (Mitchell Starce) याने सहा धावांवर असताना कॅमरुन ग्रीनकरवी झेलबाद केले. त्यानंतर आलेल्या कुशल मेंडिस (Kusal Mendis) याने दिमुथ करुणारत्ने सोबत दुसऱ्या विकेटसाठी १५२ धावांची भागीदारी रचली आहे. मेंडिसने ८५ आणि करुणारत्ने ८६ धावा करत बाद झाले.
A solid Test half-century from Dinesh Chandimal 👏
Watch #SLvAUS LIVE on https://t.co/MHHfZPyHf9 (in select regions) 📺#WTC23 | 📝: https://t.co/rLt7mhNkl4 pic.twitter.com/DqhZY0oEas
— ICC (@ICC) July 10, 2022
अँजलो मॅथ्यूजने ५२ धावा केल्या आहेत. दिनेश चंडिमल (Dinesh Chandimal) यानेही ८१ धावा आणि कुशल मेंडिस ४३ धावा करत खेळपट्टीवर उपस्थित आहेत. ऑस्ट्रेलियाने पहिला सामना १० विकेट्सने जिंकला आहे. यामुळे दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत पाहुणा संघ १-० असा पुढे आहे. हा सामना जिंकून यजमान संघाला मालिका बरोबरी करण्याचा निर्धार असणार आहे. मात्र श्रीलंका संघ ऑस्ट्रेलियाला चांगलीच लढत देत आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘…हेच भारताच्या विजयाचे प्रमुख कारण’, इंग्लंडच्या दिग्गजाने केले टीम इंडियाचे कौतुक
Video: क्रिकेटच्या मैदानाबाहेरही शोएबने केला पराक्रम; शैतानावर टाकला ताशी १०० किमीच्या वेगाने दगड
ऑटोग्राफ मागायला आलेल्या मुलीवरच झाले गावसकरांना प्रेम, वाचा त्यांची प्रेमकहाणी