---Advertisement---

SLvsAUS Test: दिनेश ऍण्ड रमेश ऑन द क्रिज, चंडिमलच्या शतकाने ऑस्ट्रेलियाला टाकले बॅकफूटवर

Dinesh Chandimal
---Advertisement---

श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया (SLvsAUS) यांच्यात गॉल आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, कोलंबो येथे दुसरा कसोटी सामना सुरू आहे. रविवारी (१० जुलै) सामन्याचा तिसरा दिवसाचा खेळ सुरू असून श्रीलंकेच्या फलंदाजांनी उत्तम खेळी केली आहे. अनुभवी फलंदाज दिनेश चंडिमल (Dinesh Chandimal) याने नाबाद शतक केले आहे. त्याच्या या शतकाने श्रीलंका संघाने पहिल्या डावात आघाडी घेतली आहे.

तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला असता यजमान संघाने ६ विकेट्स गमावत ४३१ धावा केल्या आहेत. तर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३६४ धावांवर संपुष्टात आला आहे. यामुळे श्रीलंका संघाने ६७ धावांची आघाडी घेतली आहे. दिनेश ११८ धावा करत क्रिजवर आहे, तर रमेश मेंडिस ७ धावा करत क्रिजवर आहेत.

दिनेशचे हे कसोटीमधील १३वे शतक ठरले आहे. त्याने हे शतक १९५ चेंडूत हे शतक पूर्ण केले आहे. नॅथन लायन १३३वे षटक टाकायला आला असता त्याने चौथ्या चेंडूवर एकेरी धाव घेत झळकावले आहे.

दिनेशने २३२ चेंडू खेळले असून त्याने ९ चौकार आणि एक षटकार मारत नाबाद ११८ धावा केल्या आहेत. त्याने अँजलो मॅथ्यूज (Angelo Mathews) सोबत चौथ्या विकेटसाठी ८३ धावांची भागीदारी केली आहे. मॅथ्यूजने ११७ चेंडूत ४ चौकाराच्या मदतीने ५२ धावा केल्या. त्यानंतर कामिंदु मेंडिस आणि दिनेश यांनी पाचव्या विकेटसाठी १३३ धावांची भागीदारी रचली. पदार्पणाच्या सामन्यात कामिंदूने १३७ चेंडूत ७ चौकार मारत ६१ धावा केल्या. या डावामध्ये मिशेल स्टार्क, नॅथन लायन आणि मिशेल स्विपसन यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या आहेत.

https://twitter.com/ICC/status/1546085568039239680?s=20&t=TP8BClOuvA3vaWD-Sv8SDg

तिसऱ्या दिवसाच्या सुरूवातीला तिसऱ्या षटकामध्येच कुशल मेंडिस (Kusal Mendis) ला लायनने पायचीत बाद केले. त्याने १६१ चेंडूत ९ चौकाराच्या मदतीने ८५ धावा केल्या. कालच्या धावसंख्येत त्याला फक्त एकच धाव जोडता आली आहे. तसेच निरोशन डिकवेला हा ५ धावा करताच बाद झाला आहे.

तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात स्टिव्ह स्मिथ आणि मार्नस लॅब्यूशेन यांनी शतके ठोकली आहेत. तर प्रबत जयसूर्याने पदार्पणाच्या सामन्यातच ६ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे.

ऑस्ट्रेलियाने पहिला सामना १० विकेट्सने जिंकला होता. हा सामनाही जिंकण्याच्या त्यांच्या आशेवर श्रीलंकेने पाणी फेरले आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

भुवनेश्वर कुमारच्या स्विंगमागे दडलयं कोणतं रहस्य? खुद्द ‘स्विंग किंग’नेच केला खुलासा

आधी भारताला शिव्या घालायचा आणि आता मात्र कौतुक करतोय, पाहा पाकिस्तानच्या माजी दिग्गजाचे ट्वीट

Video: क्रिकेटच्या मैदानाबाहेरही शोएबने केला पराक्रम; शैतानावर टाकला ताशी १०० किमीच्या वेगाने दगड

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---