श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया (SlvsAUS) यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरू आहे. गॉल स्टेडियम येथे सुरू असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ (Steve Smith) याने शतक केले आहे. त्याचे हे कसोटीमधील २८वे शतक ठरले आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी त्याने हे शतक १९३ चेंडूत झळकावले आहे. शतक करताच त्याने अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत.
शतक केल्यानंतर स्मिथने कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक धावा करण्यामध्ये माजी खेळाडू मार्क वॉ (Mark Waugh) यांना मागे टाकले आहे. वॉ यांनी १९९१-२००२ दरम्यान १२८ कसोटी खेळल्या आहेत. त्यांनी २०९ डावांमध्ये ४१.८१च्या सरासरीने ८०२९ धावा केल्या आहेत. स्मिथने ८७वा कसोटी सामना खेळताना ८१६१ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या ३६ अर्धशतकांचा देखील समावेश आहे.
स्मिथने २८वे कसोटी शतक करताच मायकल क्लार्कच्या विक्रमाची बरोबरी तर ऍलन बॉर्डर यांना मागे टाकले आहे. क्लार्कने ११५ कसोटी सामन्यात २८ शतके केली आहेत. तर बॉर्डर यांच्या नावावर २७ कसोटी शतके आहेत.
ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक कसोटी धावा करण्याऱ्या फलंदाजांमध्ये स्मिथ चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाकडून रिकी पॉटींगने कसोटीमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने १६८ कसोटींमध्ये १३३७८ धावा केल्या असून त्यामध्ये ४१ शतकांचा समावेश आहे. स्टिव्ह वॉ १०९२७ कसोटी धावा करत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर मॅथ्यू हेडन आहे. त्याने ८६२५ धावा केल्या आहेत.
A Test hundred for Steve Smith after one and half years!
Watch #SLvAUS LIVE on https://t.co/MHHfZPyHf9 (in select regions) 📺#WTC23 | 📝: https://t.co/rLt7mhNkl4 pic.twitter.com/cgSASzlIcd
— ICC (@ICC) July 8, 2022
स्मिथ आणि इंग्लंडचा जो रुट कसोटीमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या सक्रिय खेळाडूंमध्ये अग्रेसर आहेत. दोघांच्याही नावावर २८ शतके आहेत. स्मिथने १४ शतके ही परदेशांत तर बाकी १४ शतके मायदेशात केली आहेत. भारताचा विराट कोहली (Virat Kohli) याने कसोटीमध्ये २७ शतके केली असून त्यानेही १४ शतके परदेशात केली आहेत.
दुसऱ्या दिवशीही स्मिथ खेळपट्टीवर उपस्थित होता तेव्हा ऑस्ट्रेलियाची एक बाजू कोसळत असताना दुसरी बाजू त्याने लढवत धावफलक हलता ठेवला. ऑस्ट्रेेलियाचा पहिला डाव ३६४ धावांतच संपुष्टात आला आहे. स्मिथ १४५ धावा करत नाबाद राहिला आहे. तसेच मार्नस लॅब्युशेन (Marnus Labuschagne) याने १०४ धावा केल्या आहेत.
श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी घेतली होती. ऑस्ट्रेलियाने पहिला सामना १० विकेट्सने जिंकला आहे. यामुळे दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत पाहुणा संघ १-० असा पुढे आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘…म्हणून त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवावा’, माजी कर्णधार कपिल देवने विराटला फटकारले
आधी सीएसके अन् आता धोनी! जडेजाचं ‘ते’ वागणं चाहत्यांच्या जिव्हारी
दुसऱ्या टी२० सामन्यापूर्वीच रोहितच्या ‘डोक्याला शॉट’, म्हणत असेल संघात कोणाकोणाला घेऊ?