श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया (SLvsAUS) वनडे मालिकेत ऑस्ट्रेलिया संघाने सलग तिसरा वनडे सामना गमावला आहे. यामुळे श्रीलंका पाच सामन्यांच्या वनडे मालिकेत ३-१ने पुढे आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाने दौऱ्यात टी२० मालिका जिंकल्यावर चांगली सुरूवात केली होती. मात्र वनडे मालिकेत त्यांची कामगिरी खूपच निराशाजनक ठरली आहे. टी२० मालिका जिंकल्यावर ऑस्ट्रेलियाचा वनडे मालिका जिंकण्याचा हेतू यजमान संघाने धूळीत मिळवला आहे. पहिला वनडे सामना गमावल्यावर त्यांनी ऑस्ट्रेलिया संघाला सलग तीन वनडे सामन्यात पराभूत केले आहे. प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो येथे झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वॉर्नर (David Warner) याने एक विक्रम आपल्या नावे केला आहे.
या सामन्यात वाॉर्नरने ९९ धावा करून सुद्धा पाहुण्या संघाला ४ धावांनी सामना गमवावा लागला. तो ९९ धावावर असताना स्टम्प आऊट झाला. याबरोबरच वनडे क्रिकेटच्या इतिहासात स्टम्प आऊट होणारा तो दुसराच फलंदाज ठरला आहे. त्याच्याआधी भारताचा महान फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण २००२मध्ये वेस्ट इंडिज विरुद्धच्या वनडे सामन्यात स्टम्प आऊट झाला होता.
धनंजया डी सिल्वाच्या ३८व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर वॉर्नर ९९ धावावर असताना स्टम्प आऊट झाला. त्याने तिसऱ्या पंचाच्या निर्णयाची वाटही न पाहता तो माघारी परतला. वनडेमध्ये ९९ धावांवर बाद होणारा तो ऑस्ट्रेलियाचा तिसरा फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी मॅथ्यू हेडन (Matthew Hayden) २००१मध्ये भारताविरुद्ध, ऍडम गिलक्रिस्ट (Adam Gilchrist) २००३मध्ये श्रीलंकेविरुद्ध ९९ धावांवर बाद झाले आहेत.
वॉर्नर वनडे क्रिकेटच्या इतिहासात ९९ धावांवर बाद होणारा ३२वा फलंदाज ठरला आहे. त्याचे हे शतक पूर्ण झाले असते तर त्याच्या कारकिर्दीतील हे १९वे वनडे शतक ठरले असते. त्याने वनडेतील शेवटचे शतक जानेवारी २०२०मध्ये ठोकले होते.
वा़र्नरची विकेट पडल्यावर सामन्याला नवीन वळण मिळाले. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाला शेवटच्या दोन षटकामध्ये जिंंकण्यासाठी २५ धावांची आवश्यकता होती. मात्र संघ ५० षटकातच २५४ वर सर्वबाद झाला. ४९व्या षटकात चमिका करूणारत्नेने सहा धावा देत एक विकेट घेतली होती. हा क्षण महत्वाचा ठरला. श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया पाचवा वनडे सामना २४ जूनला कोलंबो येथे खेळला जाणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ENGvsIND: रोहितच्या उपस्थितीत विराटच निभावतोय कर्णधाराची भुमिका, नेमके कारण काय?
ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३० वर्षानंतर प्रथमच श्रीलंका संघाने रचला ‘हा’ इतिहास
आठवणीतील सामना: तीन वर्षांपूर्वी शमीने हॅट्रिक घेत संपविला होता ३२ वर्षाचा दुष्काळ