---Advertisement---

जवळपास ठरलं! १२७च्या स्ट्राईक रेटने फटकेबाजी करणारा ‘हा’ भारतीय श्रीलंका दौऱ्यावर करणार नेतृत्त्व

On: मंगळवार, जून 8, 2021 11:41 AM
---Advertisement---

टी20 विश्वचषक स्पर्धेचे पडघम आतापासूनच वाजू लागले असून विविध संघांनी त्यादृष्टीने तयारी सुरु केली आहे. जुलै महिन्यात भारतीय संघही श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. यावेळी भारतीय संघाची एक तुकडी इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेच्या तयारीत व्यस्त असेल. त्याचवेळी दुसरी तुकडी श्रीलंका दौऱ्यावर जाईल. या दौऱ्यात त्यांना वनडे आणि टी२० सामन्यांची मालिका खेळायची आहे. त्यामुळे हा दौरा आगामी टी20 विश्वचषकाच्या तयारीसाठी महत्त्वपुर्ण असेल.

यापुर्वी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने स्पष्ट केले होते की, श्रीलंका दौऱ्यासाठी संघात मोठे बदल करण्यात येतील. त्यामुळे आता कोण-कोण संघात स्थान मिळवू शकेल? आणि या संघाचे नेतृत्त्वपद कोणाकडे असेल? याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. अशात श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघाचा कर्णधार कोण असेल? हे जवळपास स्पष्ट झाले आहे.

नुकताच सोनी स्पोर्ट्सने भारतीय संघाचा श्रीलंका दौऱ्यावरील कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यात उभय संघांना प्रत्येकी 3 एकदिवसीय आणि टी20 सामने खेळले जाणार असल्याची माहिती दिली गेली आहे. तसेच या श्रीलंका दौऱ्यासाठी नियमित कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा यांच्या अनुपस्थितीत संघाची कमान कोण सांभाळेल याचेदेखील उत्तर मिळाले आहे.

असे म्हटले जाते की, वितरण वाहिन्यांना सगळ्यात आधी बातमी किंवा एखाद्या निर्णयाबाबत माहिती मिळत असते. दरम्यान भारतीय संघाचा श्रीलंका दौऱ्यावरील कार्यक्रम जाहीर करत असताना वितरण वाहिणी ‘सोनी टेन’कडून भारतीय संघाच्या कर्णधाराचेही नाव स्पष्ट झाले. यावरुन भारतीय संघाचा ‘गब्बर’ म्हणून प्रसिद्ध असलेला खेळाडू शिखर धवन या आगामी दौऱ्याकरिता संघाची कमान सांभाळेल, असे दिसून आले. परंतु जेव्हा ट्विटद्वारे धवनची ही बातमी लोकांना कळून चुकली, तेव्हा त्यांनी तात्काळ ते ट्विट डिलीट केले.

यानंतर आता श्रीलंका दौऱ्यावर १२७ च्या स्ट्राईक रेटने (टी२० सामन्यात) फलंदाजी करणाऱ्या धवनला संघनायक बनवले जाईल की नाही?, हे पाहाणे औत्सुक्याचे ठरेल.

असा असेल भारताचा श्रीलंका दौरा

वनडे मालिका –
१३ जुलै – पहिला वनडे सामना
१६ जुलै – दुसरा वनडे सामना
१८ जुलै – तिसरा वनडे सामना

टी२० मालिका – 
२१ जुलै – पहिला टी२० सामना
२३ जुलै – दुसरा टी२० सामना
२५ जुलै – तिसरा टी२० सामना

महत्त्वाच्या बातम्या-

मांजरेकरांसोबतच्या पर्सनल चॅटिंगचे मेसेज फॅनकडून व्हायरल, पाहा काय म्हणालेत मांजरेकर जडेजाबद्दल

पंतप्रधानांपर्यंत पोहोचला रॉबिन्सनच्या निलंबनाचा वाद; क्रिडामंत्रीही म्हणाले, ‘दंड देण्याची सीमा ओलांडली’

बस्स… आता चर्चा थांबवा; पंत-साहामध्ये ‘हा’ यष्टीरक्षक विरुसारखा बिनधास्त, तोच सध्या सर्वोत्कृष्ट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---