देशांतर्गत क्रिकेटमधील महत्वाची सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धा नुकतीच पार पडली. सोमवारी (6 नोव्हेंबर) या स्पर्धेचा अंतिम सामना पंजाब विरुद्ध बडोदा असा झाला. मोहाली स्थित पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियमवर हा सामना खेलला गेला, जो पंजाब संघाने 20 धावांनी जिंकला. पंजाबचा कर्णधार मनदिप सिंग याचे कुटुंब हा सामना पाहण्यासाठी मैदानात आले होते आणि विजयानंतर त्याची पत्नी भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2023 (Syam Mushtaq Ali Trophy 2023) हंगाम 16 ऑक्टोबर रोजी सुरू झाला होता. स्पर्धेचा अंतिम सामना सोमवारी (6 नोव्हेंबर) खेळला गेला. पुजंबा आणि बडोदा या दोन बलाढ्य संघात मुश्ताक अली ट्रॉफीचा अंतिम सामना पार पडला. पंजाबने या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. निर्धारित 20 षटकांमध्ये पंजाबने 4 विकेट्सच्या नुकसानावर तब्बल 223 धावांपर्यंत मजला मारली. प्रत्युत्तारत बडोदा संघासाठी लक्ष्य सोपे नव्हते. 20 षटकांमध्ये बडोदा संघ 7 विकेट्सच्या नुकसानावर 203 धावांपर्यंत मजल मारू शकला.
विजयानंतर पंजाबचा कर्णधार मनदीप सिंग (Mandeep Singh) ट्रॉफी घेण्यासाठी पुढे आल्यानंतर त्याच्या पत्नीला अश्रू अनावर झाले. मनदीपची पत्नी जगदीप जयसवाल (Jaideep Jaiswal) स्टॅन्डमधून हा सामना पाहत होती. आपल्या पतीला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकताना पाहून तिला भावना अनावर झाल्या आणि डोळ्यांतील पाणी रोखू शकली नाही. तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
CAPTAIN MANDEEP SINGH, HIS WIFE JAGDEEP JASWAL GOT EMOTIONAL AFTER PUNJAB, BECAME CHAMPIONS pic.twitter.com/Swt0baaASh
— Punjab Kings (@PunjabKingsCult) November 7, 2023
दरम्यान, उभय संघांतील या सामन्यात अनमोलप्रीत सिंग याला सामनावीर पुरस्कार दिला गेला. अनमोलप्रीतने अवघ्या 61 चेंडूत 113 धावा कुटल्या होत्या. तसेच निहाल वढेरायाने 61 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. कृणाल पंड्या याच्या नेतृत्वातील बडोदा संघासाठी अभिमन्यूसिंग राजपूत याने सर्वाधिक 61 धावांची खेळी केली. सलामीवीर निनाद राथवा याने 47, तर कर्णधार पंड्याने 45 धावांची खेळी केली. मात्र, हे फलंदाज 224 धावांचे विशाल लक्ष्य गाढू शकले नाहीत. पंजाबच्या विजयात अर्शदीप सिंग याने घेतलेल्या चार विकेट्स देखील महत्वाच्या ठरल्या. (SMAT Winning CAPTAIN MANDEEP SINGH, HIS WIFE JAGDEEP JASWAL GOT EMOTIONAL AFTER PUNJAB, BECAME CHAMPIONS)
महत्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी फोडून काढण्यासाठी सचिनने केली मदत, शतकी खेळीनंतर इब्राहिमने मानेल मास्टर ब्लास्टरचे आभार
ऐतिहासिक क्षण! 21 वर्षीय इब्राहिमसाठी आख्खं वानखेडे स्टेडियम राहिलं उभं, देशासाठी पहिलीच वर्ल्डकप सेंच्युरी