पुणे: फर्ग्युसन कॉलेज आणि नंदन बाळ टेनिस अकादमी यांच्या तर्फे आयोजित व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या डी.ई.एस. फर्ग्युसन कॉलेज एमएसएलटीए चॅम्पियनशीप सिरीज 12वर्षांखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटात वरद उंद्रे याने तर, मुलींच्या गटात सृष्टी सूर्यवंशी या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून विजेतेपद संपादन केले. तर दुहेरीत स्मित उंद्रे व वरद उंद्रे या जोडीने विजेतेपद पटकावले.
फर्ग्युसन कॉलेज टेनिस कोर्ट या ठिकाणी पार पडलेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटात अंतिम लढतीत दुसऱ्या मानांकित सृष्टी सूर्यवंशीने काव्या पांडेचा 6-4, 6-3 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. सृष्टी ही केंद्रीय विद्यालयमध्ये पाचवी इयत्तेत शिकत आहे.
मुलांच्या गटात अंतिम फेरीत दुसऱ्या मानांकित वरद उंद्रे याने अव्वल मानांकित स्मित उंद्रेचा 4-6, 6-1, 6-3 असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. वरद हा द ऑर्बि स्कुल शाळेत सहावी इयत्तेत शिकत आहेत. दुहेरीत अंतिम फेरीत स्मित उंद्रे व वरद उंद्रे या जोडीने नमिश हूड व आर्यन किर्तने यांचा 6-2, 6-3 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तीपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य आरजी परदेशी, डी.ई.एस कौन्सिल मेम्बर खेमराज रणपिसे, फर्ग्युसन कॉलेजचे क्रीडा संचालक गौतम सोनावणे, स्वप्निल देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक तुषाल थवाणी, संग्राम चाफेकर, एमएसएलटीए सुपरवायझर प्रविण झिटे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम फेरी: वरद उंद्रे [2] वि.वि.स्मित उंद्रे[1]4-6, 6-1, 6-3;
मुली: सृष्टी सूर्यवंशी[2] वि.वि.काव्या पांडे[4] 6-4, 6-3;
दुहेरी: मुले: अंतिम फेरी: स्मित उंद्रे/वरद उंद्रे[1] वि.वि.नमिश हूड/आर्यन कीर्तने 6-2, 6-3.
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
पुन्हा टीम इंडियाच्या जर्सीत खेळण्यासाठी ‘हा’ खेळाडू उत्सुक, वेळ दिल्याने बीसीसीआयलाही म्हटले थँक्यू
मिशेल आणि ब्लंडेल जोडीची विक्रमतोड भागीदारी, १८ वर्षांनंतर ऐतिहासिक कामगिरीची पुनरावृत्ती
पाकिस्तानला हरवत बक्षीस म्हणून मिळालेली ‘ऑडी १००’ पाहून शास्त्री भावूक, ३७ वर्षांनंतर पाहिली कार