क्रिकेट ऑस्ट्रेलियाने महिला बीग बॅश लीग मधील होबार्ट हॅरिकेन संघाची यष्टीरक्षक फलंदाज एमिली स्मिथवर एका इंस्टाग्राम पोस्टमुळे बंदी घातली आहे. तिच्यावर सोशल मीडियाशी निगडीत भ्रष्टाचार विरोधी नियमाचे उल्लंघन केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
स्मिथने 2 नोव्हेंबर रोजी बर्नी येथील वेस्ट पार्कच्या प्रतिबंधित प्लेअर अँड मॅच ऑफिशियल एरिया (पीएमओए) मधून घेतलेला एक व्हिडिओ वैयक्तिक इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला होता. ज्यात सिडनी थंडरविरुद्धच्या सामन्यासाठी होबार्टच्या अंतिम 11 खेळाडूंचा तपशील होता.
हा व्हिडिओ सामना सुरु होण्याच्या सुमारे एक तासापूर्वी पोस्ट करण्यात आला होता.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने म्हटल्याप्रमाणे संघाची माहीती बेटींगसाठी वापरली जाऊ शकते यामध्ये फँटसी स्पर्धांचाही समावेश असतो.
होबार्ट हॅरिकेन विरुद्ध सिडनी थंडर्समधील हा सामना मैदानात पाणी असल्याने नाणेफेकही न होता रद्द झाला होता.
स्मिथने क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या भ्रष्टाचारविरोधी संहितेच्या कलम 2.3.2 चे उल्लंघन करण्याचा आरोप मान्य केला आहे. त्यामुळे ती 1 वर्ष क्रिकेटच्या कोणत्याही स्वरूपात खेळण्यास अपात्र ठरली आहे. तथापि, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 9 महिन्यांची शिक्षा कमी केली आहे.
त्यामुळे आता ती महिला बिग बॅश लीग (डब्ल्यूबीबीएल) च्या उर्वरित सामन्यांमध्ये ती दिसणार नाही. त्याचबरोबर तीला वूमेन्स नॅशनल क्रिकेट लीग ही वनडे स्पर्धाही खेळता येणार नाही.
https://twitter.com/Maha_Sports/status/1196428842396610560
आता जगाने ऑस्ट्रेलियाचे नाही तर भारतीय क्रिकेटचे अनुसरण करण्याची वेळ आली आहे
वाचा- https://t.co/2la4VS0Fnk #म #मराठी @Mazi_Marathi @BeyondMarathi— Maha Sports (@Maha_Sports) November 18, 2019





