जागतिक कसोटी अजिंक्यपद 2021-23चा अंतिम सामना बुधवारी (7 जून) सुरू झाला. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ या सामन्यात आमने सामने असून लंडनच्या ओव्हल स्टेडियमवर हा थरार रंगला आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी स्टीव स्मिथ आणि ट्रेविस हेड यांनी खऱ्या अर्थाने सामन्याला रंग चढवला. स्टीव स्मिथ नेहमीप्रमाणे मोठ्या मंचावर पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियासाठी तारणहार ठरला. स्मिथने या सामन्यात अर्धशतक पूर्ण केले.
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने नाणेफेक जिंकून प्रथम ऑस्ट्रेलियाला फलंदाजीचे आमंत्रण दिले. भारतीय गोलंदाजांना चांगली सुरुवात मिळाली देखील होती. पण मध्यक्रमात ट्रेविस हेड (Travis Head) आणि स्टीव स्मिथ (Steve Smith) यांनी संयमी खेळ करत ऑस्ट्रेलियाला पुन्हा भक्कम स्थितीत आणले. स्मिथ आणि हेड ही जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात 100 धावांची भागीदारी करणारी पहिलीच जोडी ठरली आहे. यापूर्वी रॉस टेलर आणि केन विलियम्सनने डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात सर्वोत्तम 96 धावांची भागीदारी केली होती.
भारताविरुद्धचा हा सामना किती महत्वाचा आहे, हे स्मिथला चांगले ठाऊक होते. याच कारणास्तव त्याने 50 धावांचा आकडा पार करण्यासाठी एकूण 144 चेंडूंचा सामना आणि 7 चौकार मारले. स्मिथने केलेली कसलेली फलंदाजी पाहून चाहते आणि जाणकार त्याचे कौतुक करत आहेत.
भारताविरुद्ध सर्वाधिक वेळा 50 पेक्षा अधिक धावा करणाऱ्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा विचार केला, तर यातही स्मिथने मोठी मजल मारली आहे. त्याने माजी दिग्गज मॅथ्यू हेडनची बरोबरी केली आहे. हेडन आणि स्मिथ यांनी भारताविरुद्ध प्रत्येकी 14 वेळा 50 पेक्षा अधिक धावांची खेळी केली आहे. यादीत पहिला क्रमांक रिकी पाँटिंगचा आहे, ज्याने तब्बल 20 वेळा भारताविरुद्ध 50 धावांपेक्षा मोठी खेळी केली आहे.
भारताविरुद्ध सर्वाधिक वेळा 50+ धावा करणारे ऑस्ट्रेलियन खेळाडू
20 – रिकी पाँटिंग
14 – मॅथ्यू हेडन
14 – स्टीव स्मिथ
दरम्यान, स्टीव स्मिथच्या अर्धशतकापाठोपाट ट्रेविस हेडने आपले शतक देखील पूर्ण केले. हेडने अवघ्या 106 चेंडूत 14 चौकार आणि एक षटकार ठोकत 100 धावा पूर्ण केल्या. डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात शतक करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. (Smith scored a half-century against India in the WTC final)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कुस्तीपटूंना दिलासा! क्रीडा मंत्र्यांसोबतच्या बैठकीत मोठा निर्णय, बजरंग पुनियाने दिली माहिती
भरतने लंडनमध्ये दाखवली चित्त्याची चपळाई, खोऱ्याने धावा काढणाऱ्या वॉर्नरचा ‘असा’ काढला काटा, Video