भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023चा अंतिम सामना खेळला जात आहे. बुधवारपासून (दि. 07 जून) लंडनच्या के ओव्हल मैदानात खेळल्या जात असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फलंदाज ट्रेविस हेड चांगलाच चमकला आहे. हेडने जबरदस्त शतक झळकावले आहे. तो अशी कामगिरी करणारा स्पर्धेच्या इतिहासातील पहिलाच खेळाडू ठरला आहे.
ट्रेविस हेडचे शतक
या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र, ऑस्ट्रेलियन फलंदाजांना रोहितचा हा निर्णय प्राथमिकरीत्या चुकीचा ठरवला. यादरम्यान ऑस्ट्रेलियाची सुरुवात जरी खराब झाली असली, तरीही त्यांच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी टिच्चून फलंदाजी केली. यामध्ये डेविड वॉर्नर याच्यासह स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) आणि ट्रेविस हेड (Travis Head) यांचा समावेश आहे. मार्नस लॅब्युशेन (Marnus Labuschagne) याच्या रूपात ऑस्ट्रेलियाची चौथी विकेट पडल्यानंतर पाचव्या स्थानी हेड फलंदाजीला आला. त्याने यादरम्यान तडाखेबंद शतक झळकावले.
हेडने त्याच्या या खेळीत 106 चेंडूंचा सामना करताना 100 धावा केल्या आणि शतक साजरे केले. या धावा करताना त्याने 1 षटकार आणि 14 चौकारांचा पाऊस पाडला. हे हेडचे कसोटी कारकीर्दीतील एकूण 6वे, तर भारताविरुद्धचे पहिले शतक ठरले.
डब्ल्यूटीसी अंतिम सामन्याच्या इतिहासातील पहिलेच शतक
विशेष म्हणजे, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा हा दुसराच हंगाम आहे. डब्ल्यूटीसी 2021 हंगामातील अंतिम सामन्यात भारत विरुद्ध न्यूझीलंड संघ आमने-सामने होते. या सामन्यात एकही फलंदाज शतक ठोकू शकला नव्हता. अशात हेडने भारताविरुद्ध शतक ठोकत इतिहास रचला आहे. हेड डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात शतक ठोकणारा पहिला फलंदाज ठरला आहे. (travis head hit century in wtc final 2023 and create history)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भरतने लंडनमध्ये दाखवली चित्त्याची चपळाई, खोऱ्याने धावा काढणाऱ्या वॉर्नरचा ‘असा’ काढला काटा, Video
‘हे काय गार्डन बनवलंय’, ओव्हलची खेळपट्टी पाहून चाहते हैराण, युजरच्या प्रश्नावर कार्तिकचा भन्नाट रिप्लाय